Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा पुन्हा लगेज चेक-इन होणार नाही? आता प्रवाशांचा वेळ वाचणार, Air India ने सुरु केली विशेष सेवा!

Air India ने भारत सरकारच्या 'हब अँड स्पोक' मॉडेल अंतर्गत आपली पहिली 'इझी कनेक्ट' सेवा वाराणसी ते दिल्ली दरम्यान अधिकृतपणे सुरू केली आहे. यामुळे आता वाराणसीहून दिल्लीमार्गे आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिल्ली विमानतळावर उतरून पुन्हा लगेज चेक-इन करण्याची किंवा इमिग्रेशनसाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 26, 2026 | 01:08 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भारत सरकारच्या ‘हब अँड स्पोक’ मॉडेल
  • ‘इझी कनेक्ट’ सेवा वाराणसी ते दिल्ली दरम्यान
  • पुन्हा लगेज चेक-इन करण्याची गरज नाही
Air India Easy Connect: तुम्ही विमानातून लांब पल्ल्याचा किंवा परदेशात प्रवास करत असाल आणि हा प्रवास फक्त एका विमानापूरता मर्यादीत नसून त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या विमानातूनही प्रवास असेल. तर आतापर्यंत प्रत्येक वेळी आपल्या सामानाची तपासणी केली जायची. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तशी सिस्टीमच असल्याने पुन्हा पहिल्या विमानतळावरुन दुसऱ्या विमानतळावर उतरल्यानंतर पुन्हा सामानची चेकिंग केली जात असे. पण आता तसं होणार नाही आहे. Air India ने प्रवाशांचा वेळ वाचावा यासाठी नवी विशेष सेवा आणली आहे. नेमकी काय आहे ही सेवा? आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होणार आहे? जाणून घेऊयात.

Market Fall: भारतात Share Market बंद पण South Korea मार्केटमध्ये हाहाःकार! ट्रेडिंग थांबवण्याची आली वेळ

‘हब अँड स्पोक’ नावाची सेवा

लहान आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या हब विमानतळांवर कनेक्टिंग आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी, ‘हब अँड स्पोक’ नावाची एक नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे. हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी गुरुवारी वाराणसी विमानतळावरून या सेवेचे उद्घाटन केले. ही सेवा एअर इंडियाने सुरू केली आहे.

लहान आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून मोठ्या विमानतळांवर कनेक्टिंग आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांचे सामान, इमिग्रेशन आणि कस्टम्सची प्रक्रिया वाराणसी विमानतळावरच पूर्ण केली जाईल. दिल्लीत उतरल्यानंतर त्यांना आता पुन्हा सामान चेक करण्याची गरज भासणार नाही. वाराणसी विमानतळावरून सुरू झालेली ही सेवा लवकरच ‘इझी कनेक्ट’ विमानसेवा म्हणून मुंबई, अहमदाबाद, अमृतसर, चेन्नई, गोवा, गुवाहाटी, हैदराबाद, कोची, पाटणा, वडोदरा आणि विशाखापट्टणम येथे विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांचा बराच वेळ वाचणार असून त्याचा बराच फायदा होणार आहे.

पहिलं विमान उड्डाण

इझी कनेक्ट सेवेअंतर्गत पहिले विमान, ‘एआय-११११’, गुरुवारी सकाळी ९:२३ वाजता वाराणसीहून दिल्लीसाठी रवाना झालं. विमानातील प्रवासी दुबई, कोलंबो, जेद्दाह, रियाध, काठमांडू आणि फुकेट यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्थळांकडे जाणारे होते. सर्व प्रवाशांचे सामान, इमिग्रेशन आणि कस्टम्सची प्रक्रिया वाराणसी विमानतळावरच पूर्ण करण्यात आली. दिल्लीत आगमन होण्याच्या चार तासांच्या आत ज्या प्रवाशांची आंतरराष्ट्रीय कनेक्टिंग फ्लाईट होती, त्या सर्वांना या सेवेचा लाभ मिळाला.

स्मृतिचिन्ह बोर्डिंग पास

केंद्रीय मंत्री नायडू यांनी उद्घाटनपर इझी कनेक्ट फ्लाईटमध्ये चेक-इन करणाऱ्या पहिल्या प्रवाशाला एक स्मृतिचिन्ह बोर्डिंग पास प्रदान केला. याप्रसंगी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा, अतिरिक्त सचिव पुनीत कंसल, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार आणि एअर इंडियाचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Amazon चा भारतात तब्बल $ 48,000,000,000 गुंतवणुकीचा मेगा प्लॅन, 38 लाख नोकऱ्या; 1.5 कोटी व्यवसाय अन्…

Web Title: Air india launches easy connect flights from varanasi to delhi no luggage recheck see more details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • air india
  • Air India latest news
  • Aviation
  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Market Fall: भारतात Share Market बंद पण South Korea मार्केटमध्ये हाहाःकार! ट्रेडिंग थांबवण्याची आली वेळ
1

Market Fall: भारतात Share Market बंद पण South Korea मार्केटमध्ये हाहाःकार! ट्रेडिंग थांबवण्याची आली वेळ

Air India Bombing : अखेर कॅनडाची कबुली! 1985 च्या विमान बॉम्बस्फोटामागे खलिस्तानी दहशतवाद्यांचाच हात; ४१ वर्षानंतर सत्य आलं समोर
2

Air India Bombing : अखेर कॅनडाची कबुली! 1985 च्या विमान बॉम्बस्फोटामागे खलिस्तानी दहशतवाद्यांचाच हात; ४१ वर्षानंतर सत्य आलं समोर

Amazon चा भारतात तब्बल $ 48,000,000,000 गुंतवणुकीचा मेगा प्लॅन, 38 लाख नोकऱ्या; 1.5 कोटी व्यवसाय अन्…
3

Amazon चा भारतात तब्बल $ 48,000,000,000 गुंतवणुकीचा मेगा प्लॅन, 38 लाख नोकऱ्या; 1.5 कोटी व्यवसाय अन्…

Investment Platform India : फंड्सइंडियाने सिक्योर्ड NCD द्वारे उभारले 44.6 कोटी रुपये; तंत्रज्ञान आणि गुंतवणूक सेवा विस्तारावर भर
4

Investment Platform India : फंड्सइंडियाने सिक्योर्ड NCD द्वारे उभारले 44.6 कोटी रुपये; तंत्रज्ञान आणि गुंतवणूक सेवा विस्तारावर भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.