‘अच्छे ने अच्छा और, बुरे ने बुरा…’ अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनसाठी लिहिली लांबलचक पोस्ट; वाचा सविस्तर
गेल्या अनेक दिवसांपासून अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे महागडी प्रॉपर्टी घेताना दिसत आहेत. मागच्या महिन्यातही अभिषेकने मोठी प्रॉपर्टी विकत घेतली होती. आता बच्चन पितापुत्रांनी तब्बल 10 फ्लॅट्स विकत घेतले आहेत. यावेळी याचीच चर्चा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हे फ्लॅट्स अत्यंत महाग आहेत. अमिताभ बच्चन हे गेल्या 50 हून अधिक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. तर अभिषेकही बॉलिवूडमध्ये गेल्या 20 वर्षांपासून सक्रिय आहे. दोघांकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे. आता त्यांच्या मालमत्तेत या 10 फ्लॅट्सचाही समावेश झाला आहे.
मुलुंड परिसरात आहेत आलिशान फ्लॅट्स
बच्चन कुटुंबांनी हे फ्लॅट्स ओबेरॉय रिएलिटी प्रोजेक्टमध्ये घेतले आहे. यात 3 बीएचके आणि 4 बीएचके अपार्टमेंट्स आहेत. अशाप्रकारे त्यांनी एकूण 10 फ्लॅट्स विकत घेतले आहेत. अभिषेकने याआधीही 12 फ्लॅट्स विकत घेतल्याचे कळले होते. आता त्याने आपल्या वडिलांसोबत मुलुंड परिसरात आलिशान फ्लॅट्स विकत घेतले आहेत. या मालमत्तेची किंमत 24.25 कोटी रूपये म्हणजेच जवळपास 25 कोटी रूपये आहे. स्क्वेअर यार्ड्सच्या वृत्तानुसार, अभिषेक व अमिताभ यांनी मुंबईत आतापर्यंत जवळपास 219 कोटी रूपयांची मालमत्ता खरेदी केली आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
10 अपार्टमेंट्सची केलीत खरेदी
आता समोर आलेल्या माहितीनुसार या नव्याने विकत घेतलेल्या काही प्रॉपर्टीविषयी जाणून घेऊयात. स्क्वेअर यार्ड्सवरील नोंदणी दस्तऐवजानुसार, अमिताभ व अभिषेक यांनी ओबेरॉय रिअल्टीच्या प्रीमियम निवासी प्रकल्प इटर्नियामध्ये 10 अपार्टमेंट्स खरेदी केली आहेत. यापैंकी 8 अपार्टमेंट्सचे क्षेत्रफळ प्रत्येकी 1049 चौरस फूट आहे. तर इतर दोन अपार्टमेंट्सचे क्षेत्रफळ 912 चौरस फूट प्रत्येकी आहेत. 25.95 कोटी रूपयांत त्यांनी 10216 चौरस फूट क्षेत्रफळ असलेली मालमत्ता खरेदी केली आहे.
यातील 10 पैंकी 6 अपार्टमेंट्स हे अभिषेकने घेतल्याचे कळते आहे. अभिषेकने यासाठी 14.77 कोटी रूपये मोजले आहेत. तर इतर 4 अपार्टमेंट्स अमिताभ बच्चन यांनी खरेदी केली आहेत. या अपार्टमेंट्सची किंमत 10.18 कोटी रूपये आहे. यासाठी अमिताभ व अभिषेक यांनी 1.50 कोटी रूपयांचे मुद्रांक शुल्कही भरले आहेत. यापूर्वी, यावर्षी जानेवारीत अयोध्या येथील एका पॉश जागेत अमिताभ बच्चन यांनी प्रॉपर्टी विकत घेतली आहे. तर अभिषेकने काही महिन्यांपूर्वीच ‘जलसा’ बंगल्याजवळ मालमत्ता खरेदी केली. त्यापूर्वी त्याने बोरिवलीत एकूण 6 नवे फ्लॅट्स विकत घेतले होते. त्याने ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये 6 फ्लॅट्स घेतले. यासाठी अभिषेकने तब्बल 15.41 कोटी रुपये मोजले होते.