अनिल अंबानींची रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्फोटके, दारूगोळा, लहान शस्त्रे बनवणार; 10,000 कोटींची गुंतवणूक करणार!
रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर रिलायन्स हे नाव मुकेश अंबानी यांच्याकडे राहणार की त्यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्याकडेच राहणार? याबाबत काही काळासाठी मोठे संकट निर्माण झाले होते. मात्र, यावर अंबानी कुटुंबाने एक उत्तम उपाय शोधला. शेवटी दोन्ही भावांना रिलायन्सचा ब्रँड वापरता येईल, असे त्यांच्यात ठरले. मात्र, आता रिलायन्स या नावावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. हिंदुजा समूहावर रिलायन्सचे नाव वापरल्याचा आरोप करत, अनिल अंबानी यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात (एनसीएलटी) धाव घेतली आहे.
नावाचा वापर थांबवण्यासाठी याचिका दाखल
अनिल अंबानी यांच्या मालकीच्या अनिल धीरूभाई अंबानी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने एनसीएलटीमध्ये दावा दाखल केला आहे. अनिल अंबानी यांनी याचिकेत हिंदुजा समूहाच्या मालकीच्या असलेल्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्सला रिलायन्सचे नाव वापरण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या रिलायन्स कॅपिटलच्या रिझोल्यूशन प्लॅनची अंमलबजावणी केल्यानंतर, रिलायन्स हे नाव न वापरण्याची सूचना कंपनीला देण्यात यावी. असे व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या याचिकेत म्हटले आहे. दरम्यान, एनसीएलटी मंगळवारी (ता.२०) या प्रकरणावर सुनावणी करणार आहे.
हेही वाचा – अदानी समूह खरेदी करणार रिलायन्स पॉवरचा प्लांट, 3000 कोटींमध्ये डील होण्याची शक्यता
काय आहे संपुर्ण प्रकरण?
इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्सच्या रिझोल्यूशन प्लॅनला एनसीएलटीने फेब्रुवारीमध्ये मंजुरी दिली होती. त्यावेळी एनसीएलटीने निर्देश दिले होते की, इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स पुढील 3 वर्षांसाठी रिलायन्सचे नाव वापरू शकतात. इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्सने अलीकडेच कर्जदारांना 9,641 कोटी रुपये देऊन, रिलायन्स कॅपिटलचे अधिग्रहण केले होते. रिलायन्स कॅपिटल 25 हजार कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरली होती. आयआयएचएलने लिलावादरम्यान रिलायन्स कॅपिटलला विकत घेतले होते.
काय म्हटलंय याचिकेत?
रिलायन्स ब्रँडचा वापर केवळ अंबानी कुटुंबियच करू शकतात, असे याचिकेत म्हटले आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीची जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लवकरच देशात आर्थिक सेवा सुरू करणार आहे. अशा परिस्थितीत अंबानी बंधूंशिवाय इतर कोणालाही रिलायन्सचे नाव वापरण्याची परवानगी देऊ नये. नाव वापरण्याची परवानगी देताना त्यांची बाजू ऐकून घेण्यात आलेली नाही, असेही अनिल धीरूभाई अंबानी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या याचिकेत म्हटले आहे.