'या' बँकेच्या कोट्यवधी कर्जदारांना मोठा झटका; व्याजदरात मोठी वाढ, कर्ज महागणार!
अलिकडेच बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युको बँक, एचडीएफसी बॅंक या आघाडीच्या बॅंकानी आपल्या कर्जदरात वाढ केली होती. अशातच आता स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून आपल्या कर्जदरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता याचा ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. बॅंकेकडून आपल्या कर्जदरात तब्बल १० बेसिस पॉईंटने वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे आता एसबीआय बॅंकेचे कर्ज ०.१० टक्क्यांनी महागणार आहे. परिणामी, आता कर्जावरील ईएमआय महाग होणार असून, सामान्यांसाठी कर्ज घेणे महाग होणार आहे.
१५ ऑगस्टपासून लागू होणार नवीन दर
स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून (एसबीआय) एमसीएलआरमध्ये वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे आता बँकेच्या कर्जदरात वाढ होणार असून, नवीन व्याजदर हे १५ ऑगस्टपासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे मागील तीन महिन्यात स्टेट बँँक आफ इंडियाकडून करण्यात आलेली ही सलग तिसरी वाढ आहे. नव्याने लागू करण्यात आलेल्या एमसीएलआरमुळे बॅंकेचा कर्जावरील व्यारदर आता ९ टक्क्यावरून, 9.10 ट्क्कयापर्यत वाढला आहे.
काय आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन व्याजदर?
– ओव्हरनाइट – 8.10 टक्क्यांवरून 8.20 टक्क्यांपर्यंत वाढ
– एक महीना – 8.35 टक्क्यांवरून 8.45 टक्क्यांपर्यंत वाढ
– तीन महीने – 8.40 टक्क्यांवरून 8.50 टक्क्यांपर्यंत वाढ
– सहा महिने – 8.75 टक्क्यांवरून 8.85 टक्क्यांपर्यंत वाढ
– एक वर्ष – 8.85 टक्क्यांवरून 8.95 टक्क्यांपर्यंत वाढ
– दोन वर्ष – 8.95 टक्क्यांवरून 9.05 टक्क्यांपर्यंत वाढ
– तीन वर्ष – 9.00 टक्क्यांवरून 9.10 टक्क्यांपर्यंत वाढ
कोणत्या बँकांनी केली व्याजदरात वाढ?
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. याआधी अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. विशेष म्हणजे या बँकांची नवीन व्याजदरातील वाढ ही याच महिन्यात लागू झाली आहे. या बँकांमध्ये प्रामुख्याने बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युको बँकेसह अन्य बँकांनी देखील आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बॅंकेचे नवीन व्याजदर हे १२ ऑगस्टपासून लागू झाले आहेत. तर युको बँकेने आपल्या व्याजदर हे १० ऑगस्टपासून लागू झाले आहेत.
काय असतो एमसीएलआर?
एमसीएलआर म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) हा किमान कर्जदर आहे. ज्याच्या खाली बँकेला कर्ज देण्याची परवानगी नाही. एमसीएलआरने व्यावसायिक बँकांसाठी कर्जाचे दर निश्चित करण्यासाठी पूर्वीच्या आधार दर प्रणालीची जागा घेतली. आरबीआयने कर्जासाठी व्याजदर निश्चित करण्यासाठी 1 एप्रिल 2016 रोजी एमसीएलआर लागू केला आहे. एमसीएलआरमध्ये वाढ झाल्यास कर्जांवरील व्याजदरात देखील तितकीच वाढ होते. तर एमसीएलआरमध्ये कपात करण्यात आल्यास, कर्जावरील व्याजदरात देखील घट होते.