फोटो सौजन्य - Social Media
देशभरात मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जात आहे. देशवासियांमध्ये दिवाळी विषयी एक वेगळेच आकर्षण आहे. हा सण सगळे जनसमुदाय एकत्र येऊन साजरा केला जातो. देशात दिवाळी हा सण फक्त एका धर्मापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे. देशातील सगळे धर्मिय या सणाला साजरे करतात. भारतीय बाजारात दिवसांमध्ये फार मोठी उलाढाल पाहायला मिळते. या दिवसांमध्ये लोक जास्त प्रमाणात खरेदी करतात. भारतीय संस्कृतीत घरातील प्रत्येक वस्तूला लक्ष्मी मानली जाते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या सणामध्ये जास्त प्रमाणात खरेदी केली जाते आणि घरात नव्या लक्ष्मीचे गृहप्रवेश केले जातात.
हे देखील वाचा : भविष्याचा विचार करता गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या
त्याचा मोठा फायदा भारतीय बाजारपेठेला होतो. त्या दिवसांमध्ये केले गेलेली खरेदी शुभ मानली जाते. फक्त हिंदूच नव्हे तर इतर धर्मीय सुद्धा या काळात खरेदी करतात. बाजारात मागणी वाढल्याने अनेक वस्तूंवरच्या किमतीवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते. त्याचा फायदा संपूर्ण देशवासी घेत असतात. दिवाळी फक्त पाच दिवसांपूर्वी मर्यादित असली तरी तरी जवळ जवळ तो महिना बाजारपेठेसाठी फार महत्त्वाचा असतो. दिवसांमध्ये बाजारात लाखो कोटी रुपयांची उलाढाल होत असते.
2023 मध्ये दिवाळीच्या सणात सुमारे 3.5 लाख कोटी रुपयांची उलाढाल भारतीय बाजारात नोंदवली गेली होती. यंदाच्या वर्षी ही मागणी वाढण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये दिवाळीच्या सणात सुमारे 4.25 लाख रुपयांची उलाढाल भारतीय बाजारात नोंदवली जाईल अशी अपेक्षा ऑल इंडिया ट्रेडर्स महासंघाने वर्तवली आहे.
यंदाच्या दिवाळीत लोक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जास्त पैसे गुंतवत आहेत. एकंदरीत 25% खर्च हा इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी जाऊ शकतो अशी अपेक्षा आहे.
हे देखील वाचा : चांगल्या रिटर्न्ससाठी टॅक्स फ्री सरकारी बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करणं योग्य? ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
9 टक्के खर्च दागिन्यांवर, 12 टक्के खर्च कपड्यांवर, 4 टक्के खर्च मिठाईवर, 3 टक्के खर्च घर सजवण्याच्या सामानावर, तर 6 टक्के खर्च सौंदर्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर केले जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मोबाईल फोन, पूजेसाठी लागणारे साहित्य आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसवर ग्राहक पैसे गुंतवणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी बाय वन गेट वन ऑफर तसेच इतर काही तर्क बाजारपेठेत लढवण्यात आलेले आहेत.गेल्या वर्षीपेक्षा यंदाची दिवाळी भारतीय बाजारपेठेत जास्त उलाढाल करणारी ठरणार आहे.