ब्लू डार्टकडून दुसऱ्या तिमाहीमध्ये 1,448 कोटींची विक्री जाहीर; झालाय 60.76 कोटींचा नफा!
ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेड ही दक्षिण आशियातील अग्रगण्य एक्सप्रेस एअर, एकात्मिक वाहतूक आणि वितरण लॉजिस्टिक्स कंपनी असून त्यांनी 30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल आज मुंबईत झालेल्या त्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जाहीर केले.
कंपनीने 30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत 60.76 कोटींचा करोत्तर नफा नोंदवला आहे. याच कालावधीत ऑपरेशन्समधून मिळालेले उत्पन्न 1,448.46 कोटींवर पोहोचले आहे. ब्लू डार्टची उत्कृष्ट सेवा गुणवत्ता, प्रगत ऑटोमेशन आणि तंत्रज्ञानामुळे अधिक मजबूत झाली आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सर्व लॉजिस्टिक गरजांसाठी एकसंध आणि सुलभ समाधान मिळते.
हे देखील वाचा – वेळेआधीच एफडी मोडल्यावर भरावा लागेल दंड; वाचा… कोणती बॅंक किती शुल्क आकारते?
कंपनीच्या कामगिरीवर भाष्य करताना, ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर बॅलफर मैनुअल म्हणाले, “या तिमाहीत आम्ही गेल्या वर्षीच्या तुलनेने भक्कम महसूल वाढ साधली आहे. पारंपरिक आणि उदयोन्मुख क्षेत्रांतील आमच्या भक्कम कामगिरीचे हे द्योतक आहे. क्षमता नेटवर्क विस्तारासाठी धोरणात्मक गुंतवणुकीस वाढलेल्या उत्पन्नाची मदत होते. यामध्ये नवीन विमाने ताफ्यात सामील करणे आणि सेवा सुधारणे यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा – पेटीएमचा शेअर निम्म्या किंमतीत खरेदी करण्याची संधी; किंमत 1000 रुपयांपर्यंत जाणार?
ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. बी2बी आणि ई-कॉमर्स वितरणासाठी आम्ही ग्राउंड हब आणि डिलिव्हरी सेंटर्स विकसित करत आहोत. या गुंतवणुकीमुळे नेटवर्कची विस्तारक्षमता, लवचिकता आणि अचूकता वाढेल. भविष्यातील शाश्वत विकासासाठी वेगाने काम होईल. नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी आम्ही लवचिक आणि नवोन्मेषी राहणार असून भविष्यातील संधींचा उपयोग करून घेण्यासाठी आणि ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”
हे देखील वाचा – शेअर बाजार सावरला… सेन्सेक्सची 1900 अंकाने उसळी; निफ्टी 23900 अंकांच्या पार!
कंपनीच्या सकारात्मक दृष्टिकोनातून भविष्यातील संधींचा फायदा घेण्याची कंपनीची तयारी दिसून येते. आपली विश्वासार्हता टिकवून ठेवत ब्लू डार्ट भविष्याच्या संधींचा फायदा घेण्यास तयार आहे. कंपनी विविध उपक्रमांद्वारे शाश्वत विकासाला गती देत आहे. वेगाने विकसित होणाऱ्या भौगोलिक आणि औद्योगिक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून ई-कॉमर्ससारख्या मेगाट्रेंड्सवर विशेष भर देत आहे. एक विश्वासार्ह ट्रेड फॅसिलिटेटर म्हणून ब्लू डार्ट प्रमुख बाजारपेठांमध्ये आपला वॉलेट शेअर (SOW) वाढवत आहे. कंपनी या क्षेत्रात नवे मापदंड निश्चित करतानाच आपल्या भागीदारांसाठी मूल्यनिर्मिती करत आहे.






