Budget 2026 Indias Fiscal Strategy Shines On The Global Economic Stage Key Highlights Explained
Budget 2026 : जागतिक अर्थव्यवस्थेत भारताच्या Budget ची ही आहे किमया; वाचा खास वैशिष्ट्ये
Union Budget 2026 : भारताचे केंद्रीय अर्थसंकल्प हे केवळ देशासाठीच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेसाठीही महत्वाचे मानले जाते. याचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होतो. जाणून घेऊयात कसा.
Budget 2026 : जागतिक अर्थव्यवस्थेत भारताच्या Budget ची ही आहे किमया; वाचा खास वैशिष्ट्ये (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Follow Us:
Follow Us:
भारताचे केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला होणार जाहीर
जाणून घ्या भारताच्या बजेटचे जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्व
काय आहे या बजेटची खास वैशिष्ट्ये
Union Budget 2026 : नवी दिल्ली : आपल्या भारताचे केंद्रीय अर्थसंकल्प (Budget) केवळ देशासाठीच नव्ह, तर जागतिक स्तरावरही अत्यंत महत्वाचे ठरते. यंदाचा २०२६ च्या अर्थव्यवस्थेचा आराखडा हा जागतिक बाजारपेठांवरही परिणाम करणार आहे. नेहमीप्रमाणे भारताच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन हा अर्थसंकल्प ११ वाजता सादर करणार आहेत. आतापर्यंत ९ वेळा त्यांनी अर्थसंकल्प सादर करुन इतिहास रचला आहे. तसेच हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या चौथ्यांदा स्थापन झालेल्या सरकारमधील दुसरे बजेट आहे. या बजेटमुळे व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक विकासावर थेट परिणाम होणार आहे.
जागतिक आर्थिक वाढीचे इंधिन : यंदा २०२६-२७ साठी आर्थिक विकासदर हा ६.७% ते ७.२% निश्चित करण्यात आली आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची प्रगती स्थिर राहणार असून ही एक आशास्थान मानली जात आहे.
पुरवठा साखळीतील बदल : भारत यंदा लॉजिस्टिक, पायाभूत सुविधा, निर्यात आणि निर्मिती क्षेत्र मजबूत करण्यावर भर देणार आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळीत (Global Supply Chain) भारत ट्रान्सशिपमेंट हब बनण्याची शक्यता आहे.
संरक्षण क्षेत्र : भारताने आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया धोरणाला चालना देण्यासाठी संरक्षण खर्चात वाढ केली आहे. यामुळे भारत जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र बनण्याची शक्यता आहे.
परदेशी गुंतवणूक आणि व्यापार : FDI धोरणे, व्यापार सुलभता, निर्मीती आणि निर्यातीला चालना, गिप्ट सिटी द्वारे भारताला जागतिक अर्थकेंद्र बनवण्याचे प्रयत्न या बजेटमधून केले जात आहेत. यामुळे परदेशी गुंतवणूकीत आणि व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. ज्याचा जागतिक अर्थव्यवस्था स्थिर राहण्यासाठी फायदा होईल.
तंत्रज्ञान आणि एआय स्पर्धा : भारताने या अर्थसंकल्पातील एक हिस्सा कृत्रिम बुद्धमत्ता आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये भारत गुंतवणूक करुन जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेत स्थान अधिक बळकट होईल.
शाश्वत आणि सर्वसमावेश वाढ : जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर भारत हरित उर्जा आणि शाश्वत सर्वसामवेशक वाढली महत्व देत आहे, यातून भारताची जागतिक जबाबदारी स्पष्ट होते.
या सर्व वैशिष्टांमुळे भारताचा आर्थिक आराखडा हा जागतिक स्तरावर महत्वाचा ठरतो. यामुळे भारताचा जागतिक स्तरावर प्रभाव वाढतो. तसेच व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक विकासावरही भारताचा व्यापक प्रभाव असल्याने यामध्ये अधिक बळकटी आल्यास भविष्यात भारता जागतिक भूमिका वाढेल. यामुळे जगभरातील अनेक देशांचे लक्ष सध्या भारताच्या अर्थसंल्पाकडे लागलेले आहे.