Sunetra Pawar Oath Taking: सु्प्रिया सुळे काटेवाडीत दाखल; अजित पवार यांच्या मातोश्रींची घेणार भेट
Sunetra Pawar Oath Taking: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधनानंतर संपुर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. काल अजित पवार यांचा सावडण्याच्या कार्यक्रम पार पडला. त्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली. अजित पवार यांच्या निधनाला चार दिवस उलटत नाहीत तोच सुनेत्रा पवार आज (31 जानेवारी) सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्याचवेळी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत इतकी घाई का करण्यात आली असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईतील राजभवनात सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची तयारी सुरू असून दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे काटेवाडीत दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. इतर सर्व आमदारांनीही या प्रस्तावाचे समर्थन केल्याने सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधिमंडळ नेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाल्याचे अधिकृत पत्र आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेले उपमुख्यमंत्री पद कोणाला मिळणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. पण अवघ्या काही तांसांमध्ये राष्ट्रवादीत वेगाने घडामोडी घडल्या आणि आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदावर वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर स्वीकारली असून, आज सायंकाळी ५ वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे.
केवळ उपमुख्यमंत्रीपदच नाही, तर सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य सरकारमधील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी उत्पादन शुल्क आणि क्रीडा ही दोन मंत्रालये देखील सोपवली जाणार आहेत. सत्तेचे संतुलन राखण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) पकड मजबूत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, या सगळ्या दुखवट्यानंतर आता राजकीय च्रक भिरताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केलीये. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचे नाव आघाडीवर असल्याचे समजले जात आहे. तसेच, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांची घेतली भेट घेतली आहे. चला आता सुनेत्रा पवार यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया…
सुनेत्रा पवार या माजी राज्यमंत्री आणि लोकसभा खासदार पद्मसिंह पाटील यांच्या कन्या आहेत आणि १९८५ मध्ये अजित पवार यांच्याशी लग्न केले. सुनेत्रा यांना पार्थ आणि जय पवार असे दोन मुलगे आहेत. तथापि, राजकीय कुटुंबात जन्मलेल्या आणि राजकीय कुटुंबातील सून असल्याने, त्यांचा राजकारणाशी विशेष संबंध आहे. त्या महाराष्ट्रातून त्यांचे दिवंगत पती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) प्रतिनिधित्व करणाऱ्या राज्यसभेच्या खासदार देखील आहेत. २०२४ मध्ये त्या प्रफुल्ल पटेल यांच्या जागी राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्या.






