अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार कोसळेल की सुधारेल? वाचा... काय सांगितलंय तज्ज्ञांनी?
23 जुलै अर्थात मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. ज्यासाठी आता केवळ दोन दिवसांहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन अनेक मोठ्या घोषणा करू शकतात. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांसाठी या अर्थसंकल्पात विशेष घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे त्याचा थेट परिणाम हा शेअर बाजारावर दिसून येणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर नेमका काय परिणाम होईल? याबाबत तज्ज्ञांकडून माहिती देण्यात आली आहे.
काय सांगतात तज्ज्ञ?
जेफरीजमधील इक्विटी स्ट्रॅटेजीचे जागतिक प्रमुख ख्रिस्तोफर वुड यांच्या मते, अलिकडच्या काळात भारतीय शेअर बाजार मजबूत पातळीवर असूनही, मजबूत इक्विटी मार्केट विकसित करण्याच्या भारतीय शेअर बाजार वाढ अजूनही सुरूच आहे. परिणामी, 23 जुलै रोजी अर्थसंकल्प होण्याच्या आदल्या दिवशी आणि अर्थसंकलपाच्या दिवशी इक्विटीवरील भांडवली नफा आणि करातील बदलामुळे बाजारात लक्षणीय घसरण होऊ शकते. जी 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही दिसून आली होती.
मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार कितीये? तुम्हाला माहितीये का..? आकडा ऐकून अवाक व्हाल!
रिटेल, म्युच्युअल फंडवर अवलंबून
असे असले तरी म्युच्युअल फंडातील किरकोळ गुंतवणूकदारांची वाढती संख्या शेअर बाजाराला बळकटी देईल, असा विश्वासही वुड यांनी व्यक्त केला आहे. भाजपला निवडणुकीत धक्के बसले असतानाही शेअर बाजार झपाट्याने वधारला आहे. 4 जूनपासून शेअर बाजारात 13.3 टक्के ची वाढ झाली आहे. यामुळे वेगाने होणारी पुनर्प्राप्ती किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढत्या प्रभाव दाखवते. गुंतवणूकदारांनी शेअर्सची खरेदी सुरूच ठेवली आहे.
गुंतवणूकदार, म्युच्युअल फंडचा हिस्सा वाढला
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, भारतीय शेअर बाजाराचे स्वरूप बदलत आहे. किरकोळ गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडांनी त्यांचा हिस्सा आर्थिक वर्ष 21 च्या शेवटी 16.6 टक्क्यांवरून आर्थिक वर्ष 24 च्या शेवटीपर्यंत 18.4 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. याउलट, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FII) मालकी याच कालावधीत 22.1 टक्क्यांवरून, 19.9 टक्क्यांपर्यंत घसरली आहे.
अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमला का ठेवतात बंदिस्त? मोबाईल वापरण्याचीही नसते परवानगी! वाचा सविस्तर…
‘या’ मुद्यांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला
वुड यांनी गुंतवणूकदारांना लोकप्रिय घोषणांच्या माहितीसाठी अर्थसंकल्प 2024 वर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. भांडवली नफा कर दरात संभाव्य वाढीबद्दल कमी चिंता असली तरी, कोणतीही महत्त्वपूर्ण घोषणा अपेक्षेपेक्षा मोठी बाजार सुधारणा घडवून आणू शकते. अर्थसंकल्पात अल्पसंख्याक पक्षांच्या मागण्यांची दखल घेणे अपेक्षित आहे.
भारतीय शेअर बाजारातील आत्मविश्वास वाढवणारा आणखी एक घटक म्हणजे रुपयाच्या दीर्घकालीन स्थिरता आहे. स्थिर रुपयामुळे भारतीय समभागांचे आकर्षण वाढेल, जे प्रामुख्याने देशांतर्गत मागणी वाढवेल. हे देशांतर्गत लक्ष, वाढता किरकोळ सहभाग आणि स्थिर चलनाची अपेक्षा यामुळे शेअर बाजाराची सतत वाढ होऊ शकते.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)