अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमला का ठेवतात बंदिस्त? मोबाईल वापरण्याचीही नसते परवानगी! वाचा सविस्तर...
२३ जुलै रोजी निर्मला अर्थमंत्री सीतारामन देशाचा आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करणार आहे. मात्र, आता देशाचा अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना 16 जुलै रोजी झालेल्या हलवा समारंभापासून बंदिस्त ठेवण्यात आले आहे. याबाबत अनेकांना प्रश्न निर्माण होतो की? अर्थसंकल्प तारयार करणाऱ्या टीमला नेमके बंदिस्त का ठेवले जाते? इतकेच नाही तर कुटूंबीयांसोबत बोलण्याची देखील परवानगी नसते? याशिवाय संसदेतील उत्तर ब्लॉक-मुख्यालय असलेल्या परिवारातून बाहेर देखील पशु दिले जात नाही? याच पार्श्वभूमीवर आज आपण अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमला नेमके बंदिस्त का ठेवले जाते? याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.
ही आहेत प्रमुख कारणे?
अर्थसंकल्पामुळे काय महागणार आणि काय स्वस्त होणार हे समजत असते. याशिवाय नागरिकांच्या जीवनशैलीवर नेमका काय परिणाम होणार? याबाबत देखील माहिती मिळत असते. परिणामी, देशाचा अर्थसंकल्प हा खूप गोपनीय पद्धतीने तयार केला जातो. विशेष म्हणजे कित्येक महिन्यांच्या कालावधीनंतर संसदेत अर्थसंकलप सादर केला जातो. त्यामुळे ही गोपनीयता पाळली जाते.
(फोटो सौजन्य : ‘एक्स’ हॅन्डल)
देशाचा अर्थसंकल्प नेमका कोण तयार करते? ‘ही’ आहे यंदाची संपूर्ण टीम… ज्यांनी दिलंय मोलाचं योगदान!
मोबाईल वापरण्यासही नसते परवानगी
सर्वसाधारणपणे अर्थसंकलप सादर करणाऱ्या टीमला एक आठवडा आधी बंदिस्त ठेवले जाते. अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांसह संपूर्ण टीमच्या नावांबाबत गुप्तता पाळली जाते. विशेष म्हणजे संबंधित अधिकाऱयांना मोबाईल वापरण्याची आणि कुटुंबियांना भेटण्याची देखील परवानगी नसते. याशिवाय इंटरनेट नसलेल्या एका मोठ्या खोलीमध्ये त्यांच्यासाठी केवळ एक इनकमिंग असलेला लँडलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला जातो. अधिकाऱ्यांना आपल्या परिवारातील सदस्यांसोबत बोलायचे असेल तर त्यांच्यासोबत त्यावेळी गुप्तचर विभागाचा कर्मचारी असतो. इतकेच नाही तर त्यांचे संपूर्ण बोलणे हे टॅप केले जाते.
जेवणाची होते तपासणी
संपूर्ण सात दिवसांच्या कालावधीमध्ये संपूर्ण टीमसोबत एक डॉक्टरांचे पथक असते. त्यांच्यासाठी येणाऱ्या जेवणाची तपासणी केली जाते. केंद्रीय अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करतात. त्यावेळी टीममधील इतर कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी दिली जाते.
अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार कोसळेल की सुधारेल? वाचा… काय सांगितलंय तज्ज्ञांनी?
काय आहे ‘लॉक-इन’ संकल्पना?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ‘लॉक-इन’ म्हणजे काय? तर ‘लॉक-इन’ हा अनेक दिवसांचा कालावधी असतो. जो अर्थसंकल्पाची गुप्तता राखण्यासाठी अस्तित्वात असतो. अर्थसंकल्प बनवण्यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांचे हे ‘लॉक इन’ असते. अर्थात आता २३ जुलै रोजी यावेळीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. तर 16 जुलै रोजी झालेल्या हलवा समारंभासह, उत्तर ब्लॉक-मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांसाठी लॉक-इन कालावधी सुरू झाला आहे.
म्हणजेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी संसदेत त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण करेपर्यंत वरील सर्व अधिकारी आणि त्यांची कर्मचाऱ्यांची सर्व टीम बंदिस्त राहते. विशेष म्हणजे या सर्वांना उत्तर ब्लॉक-मुख्यालय परिसर सोडण्याची किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याची परवानगी नसते. किंवा मोबाईल वापरण्याची देखील परवानगी नसते. 1950 मध्ये बजेट लीक झाल्यामुळे तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांनी राजीनामा दिल्यापासून ही परंपरा काटेकोरपणे पाळली जात आहे.