Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar District Budget 2026: अर्थसंकल्पामुळे पालघर जिल्ह्याचे येणार ‘अच्छे दिन’! विकासाचे नवे दरवाजे झाले खुले

२०२६ च्या बजेटमध्ये पालघरच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला असून, महिलांपासून मच्छीमारांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. मुलींना सुरक्षा आणि शिक्षण मिळण्याची शक्यता आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 02, 2026 | 11:08 AM
Palghar District Budget 2026: अर्थसंकल्पामुळे पालघर जिल्ह्याचे येणार 'अच्छे दिन'! विकासाचे नवे दरवाजे झाले खुले

Palghar District Budget 2026: अर्थसंकल्पामुळे पालघर जिल्ह्याचे येणार 'अच्छे दिन'! विकासाचे नवे दरवाजे झाले खुले

Follow Us
Follow Us:
  • अर्थसंकल्पातून पालघरसाठी विकासाची ‘महाभेट’
  • पालघरच्या तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या वाटा उघडणार 
  • महिला सक्षमीकरणासाठी ‘शी-मार्ट’ची घोषणा
 

Palghar District Budget 2026:  नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय २०२६ अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवीन दरवाजे उघडले आहेत. या बजेटमध्ये पालघरच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला असून, महिलांपासून मच्छीमारांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील मुलींना सुरक्षा आणि शिक्षण मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. देशाची आणि जिल्ह्याची प्रत्येक मुलगी सुरक्षित वातावरणात शिकू शकेल, याची खात्री करण्यासाठी जिल्ह्यात सुसज्ज ‘गर्ल्स हॉस्टेल’ उभारले जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील. एकूण विचार करता पालघर जिल्हयातील विविध घटकांच्या सर्वांगिण वकासासाठी अनेक योजनांचा लाभ मिळणार असल्याचे दिसून येत आहे.

Gold-Silver Price Rule: अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीला मोठा धक्का! गुंतवणूक करणार असाल तर हे कर नियम जाणून घ्या

गावातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंना आणि हस्तकलेला आता हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. महिलांची उत्पादने शहरात आणि जागतिक स्तरावर विकण्यासाठी ‘शी-मार्ट’ उघडले जातील. यामुळे पालघरच्या महिलांच्या हाताला काम आणि खिशात पैसा येईल. तसेच, पालघर जिल्ह्याची ओळख असलेल्या काजू आणि नारळाला आता ‘जागतिक बँड’ म्हणून विकसित केले जाईल, सरकारने यासाठी विशेष तरतूद केली असून, यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा माल जगभरात पोहोचेल आणि त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेल.

समुद्रकिनारी वसलेल्या पालघरमधील मच्छीमारांसाठी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता मच्छीमार बांधवांनी पकडलेल्या मासळीवर त्यांना कोणताही टॅक्स किंवा ड्युटी द्यावी लागणार नाही. यामुळे मत्स्य व्यवसायात मोठी वाढ होईल. पालघरच्या तरुणाच्या हाताला काम मिळावे आणि नवीन उद्योग सुरू व्हावेत, यासाठी सरकारने १०,००० कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी तयार केला आहे. यातून नवीन स्टार्टअप्स आणि नोक-यांच्या संधी उपलब्ध होतील.

Union Budget 2026: बजेटनंतर बँकिंग क्षेत्राला मोठा फटका! बँकांवर तब्बल ‘इतक्या’ लाख कोटींचा येणार भार

तसेच, जिल्हयातील जुन्या आणि बंद पडलेल्या कारखान्यांना पुन्हा चालू करण्यासाठी २०० जुन्या औद्योगिक वसाहतींना (Industrial Clus-ters) पुनरुज्जीवित केले जाईल. यामुळे पालघरमधील तारापूर, बोईसर, याडा, कुडूस या सारख्या औद्योगिक क्षेत्राला पुन्हा ‘अच्छे दिन’ येतील. अर्थसंकल्पातील घोषणांमुळे पालघर जिल्ह्यातील अनेक समाज घटकांचा विकास होणार असून भरघोस निधी मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात पालघरचा चेहरामोहरा बदलणार, अशी आशा निर्माण झाली आहे, त्यामुळे हा अर्थसंकल्प पालघरच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Web Title: Union budget 2026 opens new development avenues for palghar district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • budget 2026
  • Budget 2026-2027
  • Budget Session 2026
  • Nirmala Sitaraman
  • palghar

संबंधित बातम्या

Palghar Flood Relief : पालघरमधील पूरग्रस्तांना मोठा दिलासा! राज्य सरकारकडून विशेष मदतीची घोषणा; बँक खात्यात जमा होणार पैसे
1

Palghar Flood Relief : पालघरमधील पूरग्रस्तांना मोठा दिलासा! राज्य सरकारकडून विशेष मदतीची घोषणा; बँक खात्यात जमा होणार पैसे

Vasai News : कचऱ्यात अडकलं शहराचं सौंदर्य, कोट्यवधींच्या शिल्पांची दुरवस्था; देखभालीसाठी पुन्हा 3 कोटींचा खर्च
2

Vasai News : कचऱ्यात अडकलं शहराचं सौंदर्य, कोट्यवधींच्या शिल्पांची दुरवस्था; देखभालीसाठी पुन्हा 3 कोटींचा खर्च

Vasai News : गोळीबाराने केला दारुधंद्याचा भांडाफोड, रिसॉर्टमालकावर कारवाईचा फार्स; ग्रामस्थांचा संताप
3

Vasai News : गोळीबाराने केला दारुधंद्याचा भांडाफोड, रिसॉर्टमालकावर कारवाईचा फार्स; ग्रामस्थांचा संताप

Palghar News : बंदी काळात पर्ससीन मासेमारीस मुभा, पारंपरिक मच्छीमार आक्रमक; संघटनांकडून आंदोलनाचा पवित्रा
4

Palghar News : बंदी काळात पर्ससीन मासेमारीस मुभा, पारंपरिक मच्छीमार आक्रमक; संघटनांकडून आंदोलनाचा पवित्रा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.