फोटो सौजन्य: iStock
समर ट्रॅव्हल सीझन जवळ आला असताना क्लीअरट्रिप ही फ्लिपकार्ट कंपनी आपल्या बहुप्रतिक्षित #NationOnVacation (एनओव्हीएसी) सेलच्या तिसऱ्या एडिशनसह परतली आहे. 20 मार्चपासून सुरू होत असलेला हा ९-दिवसीय ट्रॅव्हल महोत्सव फ्लाइट्स, हॉटेल्स आणि इतर पॅकेजेसवर सर्वात मोठ्या सूट देतो, ज्यामुळे ग्राहक उत्तम दरांमध्ये त्यांचे व्हेकेशन्स बुक करू शकतात.
खास उन्हाळ्याच्या सिझनमध्ये विमानभाडे दर किमान १५ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा असताना क्लीअरट्रिप ग्राहकांची उत्तम बचत कशी होईल याकडे लक्ष देताना दिसत आहे.
Maruti Wagon R CNG साठी 1 लाखाचे डाउन पेमेंट केल्यास भरावा लागेल फक्त ‘एवढाच’ EMI
ग्राहक-केंद्रित क्लीअरट्रिपने ‘क्लीअरचॉईस’ उपक्रमांतर्गत आपल्या ऑफरिंग्ज वाढवत आहे, ज्यामुळे प्रवाशांना उत्तम बुकिंग स्थिरतेचा लाभ घेता येईल. क्लीअरचॉईस प्लस व क्लीअरचॉईस मॅक्ससह ग्राहक त्यांच्या बुकिंग्जमध्ये बदल करू शकतात किंवा संपूर्ण रिफंडसह रद्द करू शकतात, ज्यामुळे एअरलाइन बुकिंग रद्दीकरणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. मिंत्रा आणि फ्लिपकार्ट लॉयल्टी सदस्यांना देखील क्लीअरिट्रिप व फ्लिपकार्ट ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म्सवर विशेष सूट व ऑफर्सचा आनंद घेता येईल.
या लाँचबाबत मत व्यक्त करत क्लीअरट्रिपचे चीफ ग्रोथ अँड बिझनेस ऑफिसर अनुज राठी म्हणाले, “क्लीअरट्रिप ट्रॅव्हल किंमत मॉडेल्समध्ये नाविन्यतेला चालना देण्याप्रती कटिबद्ध आहे. आगामी महिन्यांमध्ये विमानभाडे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा असताना एनओव्हीएसीचे हे एडिशन प्रवाशांना सर्व स्तरावर पुढे राहण्यास मदत करण्याची आमची पद्धत आहे. आधीच नियोजन करत ग्राहक किंमत वाढीच्या अनिश्चिततेला टाळू शकतात आणि विनासायासपणे, किफायतशीर व उत्साहाने प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.”
सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे कार खरेदीदारांच्या खिशाला बसणार कात्री ! EV आणि CNG कार महागणार
● ९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत फ्लाइट्स
● ५९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स
● २४९९ रूपयांपासून सुरू होणारे लक्झरी हॉटेल्स (४- व ५-स्टार)
● बस बुकिंग्जवर जवळपास ४० टक्के सूट
● हॉटेल बुकिंग्जवर ३० टक्के ते ८० टक्के सूट
● मिंत्रा इनसाइडर आयकॉनसाठी १ रूपयामध्ये क्लीअरचॉईस प्लस
● फ्लिपकार्ट व्हीआयपीसाठी १ रूपयामध्ये क्लीअरचॉईस मॅक्स
गेल्या वर्षी बुकिंग्जमध्ये 80 टक्के वाढीसह मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर क्लीअरट्रिप ग्राहक-केंद्रित ट्रॅव्हल सोल्यूशन्स डिझाइन करण्याप्रती समर्पित आहे. #NationOnVacationचे तिसरे एडिशन विविध प्रवाशांसाठी उपलब्धता आणि किफायतशीरपणामध्ये अधिक वाढ करण्यास सज्ज आहे.