महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने EMBED कार्यक्रमाचे दशकपूर्ती यश
मुंबई, ११ नोव्हेंबर २०२५: भारत सरकारने येत्या २०३० सालापर्यंत मलेरियाचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी शिल्लक असताना महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात EMBED (एलिमिनेशन ऑफ मॉस्किटो बॉर्न एन्डेमिक डिसीसेज) या बहुराज्यीय मलेरिया निर्मूलन कार्यक्रमामुळे मलेरिया आणि डेंग्यूचा प्रसार रोखण्यात यश मिळाले आहे. या कार्यक्रमाच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्ताने नुकतेच एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सभारंभास वरिष्ठ सरकारी अधिकारी, आरोग्य संस्थांचे प्रतिनिधी, तसेच या कार्यक्रमात योगदान देणारे गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
EMBED कार्यक्रमाच्या दहा वर्षांच्या महत्वपूर्ण टप्प्यावर आधारित कामगिरी पुढे नेण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. मलेरियाचे निर्मूलन अधिक जलद आणि प्रभावी पद्धतीने करता येण्यासाठी या उपक्रमात कम्युनिटी हेल्थ व्हॉलंटिअर अॅप आणि सप्लाय चेन अॅप अशा दोन नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे. कम्युनिटी हेल्थ व्हॉलंटिअर अॅप स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि स्वयंसेवकांना डिजिटल पद्धतीने लार्वा (डासांची अंडी पाण्यात फुटल्यावर त्यातून बाहेर पडणाऱ्या लहान अळ्या) आणि ताप यांचे सर्वेक्षण करण्यास मदत करते.
हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या रिअल-टाइम डेटा कॅप्चर, डॅशबोर्ड्स, जिओ-ट्रॅकिंग आणि स्मरणपत्रे या सुविधांद्वारे हे काम केले जाते. सप्लाय चेन अॅप औषधे आणि डायग्नोस्टिक किट्सच्या वितरण प्रक्रियेचे पूर्णपणे डिजिटलायझेशन करते. त्यामुळे मानवी कामातून होणारा विलंब आणि डेटा गॅप्स टाळले जातात. मलेरियाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक साधनांची वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करत रिअल-टाइम डॅशबोर्ड्स, जिओ-ट्रॅकिंग आणि स्वयंचलित सूचना वा इशारे यांच्या मदतीने अधिकारी आता साठा पाहू शकतात, वितरणाचा मागोवा घेऊ शकतात आणि गाव, ब्लॉक आणि जिल्हा स्तरावर होणारा तुटवडा त्वरीत भरून काढू शकतात.
देशातील वाढत्या मलेरिया आणि डेंग्यूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने EMBED हा धोरणात्मक उपक्रम सुरु केला आहे. सीएसआर कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जातो. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील आरोग्य विभागांच्या सहकार्याने हा सर्वसमावेशशक आणि परिणामकारक प्रकल्प अंमलात येत आहे. या प्रकल्पांतर्गत तिन्ही राज्यांतील आरोग्य सेवांमधील कमतरता दूर करण्यावर भर दिला जातो. दोन्ही आजारांबबात माहिती देणे, आरोग्य सेवा कर्मचा-यांना आवश्यक प्रशिक्षण देणे आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी शिक्षण तसेच संवादकौशल्य शिकवणे, वर्तनाबद्दल आवश्यक मार्गदर्शन करणे आदी सेवा दिल्या जातात. मलेरिया आणि डेंग्यूच्या नव्या केसेसची नोंद रोखणे तसेच मृत्यूसंख्या आटोक्यात आणणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
२०१५ साली फॅमिली हेल्थ इंडिया आणि पाथ संलग्न सेंटर फॉर हेल्थ रिसर्च एण्ड इनोव्हेशन यांच्या भागीदारीत EMBED मलेरिया निर्मूलन कार्यक्रम सुरु करण्यात आला. या दहा वर्षांच्या कार्यकाळात EMBED मलेरिया निर्मूलन कार्यक्रमाचा ३२ जिल्ह्यांमध्ये प्रचार झाला आहे. ३२ जिल्ह्यांतील २७ लाखांहून अधिक कुटुंबीयांमध्ये मलेरिया आणि डेंग्यूचा आजार रोखण्यासाठी आवश्यक माहिती दिली गेली आहे. यामध्ये ८ हजारांहून अधिक झोपडपट्ट्या आणि १४ हजार गावांचा समावेश आहे. आजपर्यंत, या कार्यक्रमामुळे तिन्ही राज्यांमधील आर्थिकदृष्ट्या असुरक्षित आणि वंचित कुटुंबातील २ कोटी ८० लाख लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली.
महाराष्ट्रात २०२३ पासून हा कार्यक्रम सुरु झाला. राज्य आरोग्य विभाग आणि गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स् लिमिटेड (जीसीपीएल)द्वारे राज्यात EMBED मलेरिया निर्मूलय कार्यक्रम राबवला जात आहे. ठाणे, पालघर आणि मुंबईतील दाट लोकवस्तीच्या झोपडपट्ट्यांमध्ये मलेरिया आणि डेंग्यूच्या निर्मूलनासाठी अथक परिश्रम घेतले जात आहेत. शहरांतील या दाट लोकवस्तीच्या भागांत डेंग्यूचा केसेस वाढण्याचा धोका जास्त असतो. या दोन वर्षांच्या कार्यकाळात १ हजार ५३६ झोपडपट्ट्यांमध्ये हा प्रकल्प राबवला जात आहे. परिणामी २ लाख ८० हजार कुटुंबीयांमध्ये मलेरिया आणि डेंग्यूविषयी माहिती पोहोचवल्याने १३ लाख ६० हजार लोकांचे जीवममान सुधारण्यात मजत झाली आहे. या प्रकल्पांतर्गत ११० आशा कार्यकर्त्यंना प्रशिक्षित करण्यात आले आहे.
या दहा वर्षांच्या प्रवासाबद्दल भाष्य करताना गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर सीतापती म्हणाले, “ गेल्या १० वर्षांमध्ये आमच्या सीएसआरच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांमुळे EMBED प्रकल्प राबवला जात आहे. या प्रयत्नांतून सकारात्मक बदल घडवला जात आहे. याकरिता अथक प्रयत्न करणा-या आशासेविका, आरोग्यसेवेतील कर्मचारी ते स्थानिक स्वयंसेवकांर्यंत सर्वांचे मी अभिनंदन करतो. ”
महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर येथील ग्रामीण भागांमध्ये हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून १ हजार ५०२ गावांमधील २.०३ लाख कुटुंबातील तब्बल १० लाख लोकसंख्येला मलेरिया आणि डेंग्यूविषयी आवशयक माहिती पुरवली जात आहे. या उपक्रमांत ३२५ स्वयंसेविकांचे सक्रिय सहकार्य लाभले आहे. या प्रकल्प समुदाय संघटन आणि सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करतो. या प्रकल्पांरर्गत लोकांना मलेरियाचा प्रसार, लक्षणे आणि प्रतिबंध याबाबतीत शिक्षण दिले जाते. समुदायातील लोकांना त्यांच्या घरांमध्ये आणि आजूबाजूच्या मोकळ्या जागेतील डासांची प्रजनन ठिकाणे ओळखणे आणि नष्ट करण्याकरिता मार्गदर्शन केले जाते. डासांची प्रजनन केंद्रे नष्ट केल्याने आजारांचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त हा प्रकल्प आशा सेविकांच्या क्षमता बांधणीवर भर देतो, जेणेकरुन आजाराचे निदान आणि संपूर्ण उपचार सुनिश्चित राहतात.
गोदरेज इंडस्ट्रीज समूहाच्या गुड एण्ड ग्रीन या तत्त्वज्ञानानुसार, समाजाला सक्षम बनवण्याचा उद्देशाने जीसीपीएसच्या मदतीने चालवण्यात येत असलेला EMBED मलेरिया निर्मूलन कार्यक्रम आरोग्य व्यवस्थांचे सक्षमीकरण करतो. हा कार्यक्रम मलेरियामुक्त भारताच्या ध्येयाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी इतर राज्यांसाठीदेखील अनुकरणीय मॉडेल ठरला आहे.






