Tarique Rahman यांच्या शपथविधीसाठी भारताला आमंत्रणाने पाकिस्तानचा जळफळाट; बांगलादेशवर संताप व्यक्त (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चिमा यांनी बांगलादेश नॅशनल पार्टीचे प्रमुख तारिक रहमान यांच्याव तीव्र टीका केली आहे. भारताला आमंत्रण देणे अतिशय कमकुवत पाउल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बीएनपीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी खास आमंत्रण दिले आहे. यामुळे कमर चिमा यांनी मोठी चूक केली असून भारतविरोधी कडक भूमिका स्वीकारायला पाहिजे होती असे म्हटले आहेत. त्यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. चीन यांच्या मते, भारतीयांचा विश्वास आहे की, बांगलादेश खूप वाईट परिस्थिती असून तो त्यांच्यावर अवलंबून आहे.
त्यांनी म्हटले ककी, रहमान यांनी पंतप्रधान मोदींना आमंत्रण देऊन त्यांची भूमिका कमकुवत केली आहे. त्यांनी शेख हसीना (Sheikh Hasina) तारिक रहमान यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, “तुमच्या माजी पंतप्रधान भारतात लपून बसल्या आहे आणि तेथील पंतप्रधनांना आमंत्रित करत आहात. यावरुन तुम्ही देशासाठी उभे राहू शकत नाही आणि तुमचा दृष्टीकोन अत्यंत कमकुवत आहे.”
बांगलादेशने भारत, पाकिस्तान (Pakistan), चीन (China), सौदी अरेबिया(Saudi Arabia), तुर्की, संयुक्त अरब अमिराती (UAE) कतार, मलेशिया, ब्रुनेई, श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि भूतान यांदेशांच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण दिले आहे. दक्षिण आशियापासून ते पश्चिम आशियापर्यंतच्या राष्ट्रांना बांगलादेशने एकाच मंचावर आमंत्रित केले आहे. यामागे नव्या सरकारची महत्वाची राजनैतिक रणनीती असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
तज्ज्ञांच्या मते, बांगलादेशने जाणीवपूर्वक प्रादेशिक संतुलनासाठी भारत आणि चीनला एकचा वेळी आमंत्रण दिले आहे. बांगलादेश यातून संपूर्ण जगातिक समुदायाला एक महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संदेश देत आहे.






