Does pressing the ‘Cancel’ button twice on an ATM keep your PIN safe? (फोटो- सोशल मीडिया)
ATM Safety Facts: भारतीय बाजार ऑनलाइन पेमेंट अर्थात यूपीआयने काबिज केले आहे. तरीही व्यवहार करताना ATM मधून पैसे काढले जातात. बरेचजण एटीएम मध्ये जाणून अधूनमधून किंवा वारंवार पैसे काढण्यासाठी जात असतात. आणि पैसे काढून झाल्यावर कॅन्सल बटण दोनदा दोनदा दाबतात. मात्र, तुम्हाला माहितीये का ते बटन नेमकं कसं काम करत? याबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील माहिती तुमच्यासाठी..
आजकाल सोशल मीडियावर अशी अफवा उठवण्यात आली आहे की, पिन चोरीला जाण्यापासून वाचायचे असेल तर एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकण्यापूर्वी ‘Cancel’ बटण दोनदा दाबायचे आहे. फेसबुक आणि व्हॉट्सॲप सारख्या प्लॅटफॉर्मवर याबद्दल माहिती वेगाने पसरत आहे. की Cancel बटण दाबल्याने तुमचे पैसे हॅकर्स पासून सुरक्षित राहतील.
या व्हायरल बातम्यांचा परिमाण असा झाला की, एटीएम पिनबद्दल निवेदन जारी करत सरकारने स्वतःच सत्य स्पष्ट केले. पीआयबीने याबद्दल स्पष्ट करत म्हंटले आहे की, एटीएमवरील ‘कॅन्सल’ बटण दाबल्याने तुमचे पैसे हॅकर्स पासून सुरक्षित राहतात हा दावा खोटा आहे. यासाठी पीआयबीने सरकार आणि आरबीआयचा हवाला दिला असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असेही सांगितले आहे.
हेही वाचा : Todays Gold-Silver Price: सोनं चमकतंय पण चांदी उतरतेय… किंमतीचा अनोखा खेळ सुरूच, खरेदीदारांची चिंता वाढली
एटीएम कॅन्सल बटणाचे खरे काम काय?
आरबीआयने कॅन्सल बटन बद्दल खुलासा करत असे सांगितले आहे की, एटीएमवरील कॅन्सल बटण हे केवळ चुकून दुसरे बटन दाबल्यावर वापरकर्त्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी वापरले जाते. कॅन्सल बटण दाबल्यावर सुरू असलेला व्यवहार रद्द होतो. या व्यतिरिक्त याचा काही वापर नसून या बटनाचा पिन चोरी, हॅकिंग किंवा कार्ड स्किमिंगशी याच्याशी कोणताही संबंध नाही.
दरम्यान, एटीएम मशीनचं कॅन्सल बटन फसवणुकीपासून वाचवत नसेल तरीही, कार्ड घालण्यापूर्वी तुम्ही एटीएम स्लॉट आणि कीपॅड तपासून घ्या, ज्यामुळे तुम्ही फसवणुकीचा धोका टाळू शकता. तसेच, काही संशयास्पद आढळले किंवा एखादे उपकरण बसवलेले दिसले तर त्वरित बँकेला त्याची तक्रार करा.
एटीएम फसवणुकीपासून कसे वाचाल?
एटीएम फसवणूकीपासून वाचण्यासाठी वापरकर्ता जागरूक राहायला हवा. तसेच एटीएम व्यवहारांसाठी तुमचे फोन नंबर किंवा ई-मेल सेट करा जेणेकरून व्हावहार करताना तुम्हाला त्याचे अपडेट मिळत जातील. दर 3 ते 6 महिन्यांनी एटीएम पिन बदलत रहा. याव्यतिरिक्त पिन नेहमी थोडा गुंतागुंतीचा ठेवा म्हणजे ते अज्ञात व्यक्तीच्या लक्षात येणार नाही. एटीएम कार्ड चुकून हरवले तर चोरीला गेले तर तातडीने बँकेशी संपर्क साधून ब्लॉक करा.
Ans: कॅन्सल बटण सुरू असलेला चुकीचा व्यवहार तात्काळ थांबवते, ज्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होते.
Ans: कॅन्सल बटण पिन सुरक्षित करत नाही, फक्त चुकीचा व्यवहार तात्काळ थांबवते. ज्यामुळे आर्थिक नुकसान टाळते. याचा हॅकिंगशी कोणताही संबंध नाही.
Ans: एटीएम नेहमी जागरूक वापरताना स्लॉट आणि कीपॅड तपासा, संशयास्पद वस्तू दिसल्यास बँकेशी संपर्क करा. पिन नियमित बदला आणि व्यवहार अलर्ट सक्रिय ठेवा.






