फोटो सौजन्य - Social Media
गुजरातच्या जीतची ही संघर्षगाथा तसेच त्यापासून मिळालेले यश प्रत्येकाने नक्कीच जाणून घेतले पाहिजे. गुजरातच्या सुरेंद्रनगर येथे 3 जून 1999 रोजी जन्मलेले जीत शाह आज केवळ 26 व्या वर्षी करोडो रुपयांची कमाई करत आहेत. कधी स्विगी आणि उबर ईट्ससाठी फूड डिलीवरी करणारा तरुण आज डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात एक मोठा नाव बनला आहे. त्याचा हा प्रवास कठोर मेहनत, समर्पण आणि धाडसाची प्रेरणादायी गोष्ट सांगतो.
LD इंजिनिअरिंग कॉलेज, अहमदाबाद येथून 2021 मध्ये अभियांत्रिकीची पदवी घेताना जीतने अपार कष्ट घेतले. जीत सकाळी कॉलेज करायचा. तसेच दुपारी कमवण्याचा मार्ग म्हणून फूड डिलीव्हरी करायचा आणि रात्री तो करिअर नियोजन असा दिनक्रम पाळत होता. कोरोना महामारीत आलेल्या लॉकडाऊनमुळे फूड डिलीव्हरीचे काम थांबल्यानंतर त्यांनी हार न मानता डिजिटल मार्केटिंग शिकण्याचा निर्णय घेतला. मनात दृश्य निश्चय ठेऊन तो या क्षेत्रात उतरला आणि यातील सगळे कसब शिकून घेतले.
2021 मध्ये त्यांनी सिंपेक्स स्कूल प्रायव्हेट लिमिटेड ची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. अवघ्या 18 महिन्यांत त्यांनी 1 लाखांहून अधिक विद्यार्थी, उद्योजक आणि व्यावसायिकांना प्रशिक्षित केले आहे. फेसबुक जाहिराती, सेल्स फनेल, वेब डेव्हलपमेंट आणि लीड जनरेशन यांसारख्या क्षेत्रात त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे. त्याच्या या कौशल्यांनी त्याला व्यवसाय उभारण्यास फार मदत केली.
जीत केवळ उद्योजक नाहीत तर प्रसिद्ध युट्यूबरसुद्धा आहे. आपल्या चॅनलवर तो व्यवसाय, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंगबद्दल मार्गदर्शन करतो. त्यांच्या ‘कोचिंग किंग’ या पुस्तकानेही मोठी लोकप्रियता मिळवली आहे. या क्षेत्रामध्ये या पुस्तकाने फार नाव कमवले आहे. जीत शाह यांची यशोगाथा मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. “कठीण प्रसंगांवर मात करत जिंकण्याची इच्छा असेल तर यश हमखास मिळते,” हे त्यांचे आयुष्य सांगते. त्यांचा प्रवास जगातील अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात उंच भरारी घेण्याचा जीतचा प्रवास प्रत्येक तरुणापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. मुळात, जीत यांची कथा त्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, जे मोठे स्वप्न पाहतात आणि त्यांना सत्यात उतरवण्याची धमक ठेवतात.