फोटो सौजन्य: iStock
जर तुम्ही सुद्धा यंदाच्या हिवाळ्याच्या सुटीत फिरण्याचा प्लॅन बनवत असाल पण फ्लाइट्स, हॉटेल्सच्या किंमतीमुळे हे प्लॅन अर्धवट राहत असेल तर ही बाटी तुमच्यासाठीच आहे. कारण EaseMyTrip कडून एक खास विंटर सेल लाँच करण्यात आली आहे.
इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने विंटर कार्निव्हल सेल 2024 ची घोषणा केली आहे. १० डिसेंबर २०२४ पर्यंत आयोजित करण्यात आलेली ही सेल विविध ट्रॅव्हल सेवांवर सूट व अविश्वसनीय ऑफरिंग्जच्या मदतीने हिवाळ्यामध्ये प्रवास करण्याच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याची खात्री देते.
विंटर कार्निवल सेल ग्राहकांना अद्भुत डिस्कॉउंट्स देते. यात फ्लाइट्सवर जवळपास २७ टक्के सूट, हॉटेल्सवर जवळपास ५५ टक्के सूट, बसेसवर फ्लॅट १५ टक्के सूट, कॅब्सवर फ्लॅट १२ टक्के सूट, डॉमेस्टिक हॉलिडे पॅकेजेस् ६,४९९* रूपयांपासून सुरू, इंटरनॅशनल हॉलिडे पॅकेजेस् ३४,९९९* रूपयांपासून सुरू, बिझनेस क्लास फ्लाइट तिकिटांवर जवळपास २०,००० रूपयांची सूट, इत्यादींचा समावेश आहे.
कितीये देवेंद्र फडणवीस यांची एकूण संपत्ती; जे घेणार आहे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ!
या अद्भुत विंटर ट्रॅव्हल संधींना अनलॉक करण्यासाठी ग्राहक इझमायट्रिप अॅप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून बुकिंग करताना प्रोमो कोड ‘कार्निवल’ वापरू शकतात. स्पेशल कोड्स ‘कार्निवल’सह आयसीआयसीआय बँक क्रेडिट व डेबिट कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिरिक्त सूटसह ही सेल अधिक उत्साहवर्धक ठरेल.
ग्राहक बिझनेस क्लास फ्लाइट तिकिटे बुक करू शकतात आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बुकिंग्जवर जवळपास २०,००० रूपयांच्या सूटचा लाभ घेऊ शकतात. ३०,००० रूपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांवर कूपन कोड ‘ईएमटीआयसीआयसीआयबीआयझेड’ वापरा. ऑफर फक्त आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड पेमेंट्ससाठी (अॅमेझॉन पे क्रेडिट कार्ड्स वगळून) वैध आहे.
इझमायट्रिपने या सेलसाठी एअरलाइन कंपन्यांसोबत पार्टनरशिप केली आहे. यात एअर फ्रान्स, केएलएम रॉयल डच एअरलाइन्स, एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस, एअर मॉरिशस, आकासा एअर, कम्बोडिया अंगकोर एअर, इजिप्त एअर, इथियोपियन एअरलाइन्स, एतिहाद एअर, जपान एअरलाइन्स, केनिया एअर, लुफ्थान्सा एअरलाइन्स, मलेशियन एअरलाइन्स, एनओके एअर, व्हिएतनाम एअरलाइन्स, व्हर्जिन अॅटलांटिक, तुर्किश एअरलाइन्स, ब्रिटीश एअरवेज, आयटीए एअरवेज आणि स्पाइसजेटचा समावेश आहे.
या सेलसाठी प्रतिष्ठित हॉटेल चेन्ससोबत देखील पार्टनरशिप करण्यात आले आहे, जसे विट्स, स्टर्लिंग, लेमन ट्री, प्राइड, क्लब महिंद्रा, लॉर्ड्स, द क्लार्क्स, वेस्टा हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स, रॉयल ऑर्चिड, ओटीएचपीएल, फॅब हॉटेल्स, क्लार्क्स कलेक्शन, ली रॉय, जैन ग्रुप हॉटेल्स, माऊंट हॉटेल्स, वेलमक हेरिटेज, ट्रीबो, अमृतारा, फतेह कलेक्शन, ट्रूली इंडिया हॉटेल्स, मूस्ताच, टीजीआय, आयकॉन हॉटेल्स, झेड एक्स्प्रेस, इत्यादी. यामधून प्रवशांना त्यांच्या हिवाळ्यातील साहसी धमालीसाठी अनेक पर्यायांची खात्री मिळणार आहे.