शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी
प्रतिष्ठानच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयास निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक सुरेश बनसोडे, गोरख पडोळे, प्रा. माणिक विधाते, शिवाजी डोके, मंगेश खताळ, संतोष ढाकणे, अवधूत फुलसुंदर यांच्यासह मोठ्या संख्यने युवक उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की याअगोदरही पोलिस प्रशासनाकडे वेळोवेळी अवजड वाहतुकीबाबतीत तक्रारी केल्या असून, अद्याप कोणतीही कठोर कारवाई होत नाहीये. शहर परिसरात विशेषतः उड्डाणपुलावर अपघातांची मालिका सुरूच आहे.
अहिल्यानगर शहर परिसरात कायम अवजड वाहनांची वाहतूक होताना दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना रस्त्यावर वाहने चालवताना कायम अडथळे येतात व या अवजड वाहतुकीमुळेच बरेच अपघात झाले आहेत. विविध पोलिस ठाण्यामध्ये अपघाताच्या नोंदी आहेत. सदरच्या अपघातांमध्ये निष्पाप लोकांचा जीव जाण्याच्या घटना याआधीही घडलेल्या आहेत. त्याबाबत आम्ही स्वतः व राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेतर्फे तक्रारी अर्ज देऊनही अवजड वाहतूक थांबलेले दिसून येत नाही.
जड वाहनांची वाहतूक विशेषत। रात्री ८ ते सकाळी ८ यादरम्यान सर्रासपणे शहरातून होते. यातून होणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असल्यास ही अवजड वाहतूक तातडीने बंद करण्यात यावी. असे झाले नाही तर आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन करू, तसेच यानंतर होणाऱ्या प्रत्येक अपघाताला प्रशासनाला जवाबदार धरू.
उरण तालुक्यात भूकंपाचा झटका! सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, मालमत्ताही बचावली
काळे यांच्या अपघाताची व अवजड वाहतुकीला शहरात कायमची प्रवेशबंदी सात दिवसांत झाली नाही तर आम्ही पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करू, असे निवेदनात म्हटले आहे.






