चॅटबॉट फेडीची क्षमता वाढविण्यासाठी फेडरल बँकेची भाषिनीसोबत भागीदारी; ग्राहकांशी साधणार स्थानिक भाषेतून संवाद!
भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या फेडरल बँकेने आपल्या एआय आधारित व्हर्च्युअल असिस्टंट फेडीला ग्राहकांशी स्थानिक भाषेतूनही संवाद साधता येण्यासाठी भाषिनी या एआय आधारित भाषांतर मंचासोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. बँकींगला स्थानिक भाषेतून चालना मिळण्यासाठी रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (आरबीआयएच) ने स्थानिक भाषेसाठी घेतलेल्या पुढाकारातून ही भागीदारी उदयास आली आहे. याने फेडीची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार असून, त्यामुळे भारत भरातील ग्राहकांच्या विस्तृत श्रेणीला फेडीशी स्थानिक भाषेतून तिला संवाद साधणे शक्य होणार आहे.
जलद आणि सोयीस्कर बँकिंग सेवा शोधणाऱ्या ग्राहकांसाठी फेडरल बँकेचा एआय संचलित चॅटबॉट फेडी आधीपासूनच संवाद साधण्यासाठी एक लोकप्रिय साधन ठरले आहे. भाषिनीच्या भाषांतर क्षमतेची जोड मिळाल्यामुळे फेडी आता हिंदी, बंगाली, तमिळ, तेलगू, मराठी, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओडिया, आसामी, पंजाबी, उर्दू, मणिपुरी आणि बोडो यासह १४ विविध भारतीय भाषांमध्ये ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकणार आहे. या सामंजस्य करारावर फेडरल बँकेच्या कार्यकारी संचालक श्रीमती शालिनी वारियर आणि भाषिनीचे सीईओ अमिताभ नाग यांनी स्वाक्षरी केली आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
हे देखील वाचा – एचडीएफसी लाइफ सुंदरम फायनान्सच्या ग्राहकांना देऊ करणार क्रेडिट लाइफ सोल्यूशन्स!
या भागीदारीबद्दल बोलताना फेडरल बँकेच्या कार्यकारी संचालक श्रीमती शालिनी वॉरियर म्हणाल्या आहे की, “भारत हा अनेक भाषांचा देश आहे आणि आम्ही आमच्या मौल्यवान ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यात नेहमीच आघाडीवर आहोत. स्थानिक भाषेचे पाठबळ दिल्याने फेडी आता अधिक ग्राहकस्नेही झाला असून तो सहज उपलब्ध असेल, असा आम्हाला विश्वास आहे. भाषिनीसोबतची आमची भागीदारी त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इनोव्हेशन हब (आरबीआयएच) कडून आम्हाला मिळालेल्या व्यापक पाठबळामुळे आमच्या ग्राहकांची अनुभव पातळी आणखी उंचावण्यास अधिक सक्षम झालो आहोत.”
दरम्यान, भाषिनीचे सीईओ अमिताभ नाग म्हणाले आहे की, “फिनटेक विश्वात भाषेमुळे येणारे अडथळे दूर करण्यासाठी फेडरल बँकेसोबत भागीदारी करताना व्हॉइस-फर्स्ट दृष्टिकोनासह प्रगत बहुभाषिक संवाद तंत्रज्ञान फिनटेक विश्वाशी जोडले गेले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिक सेवांमध्ये क्रांती घडवून आणण्याचे भाषिनीचे उद्दिष्ट आहे. ग्राहकाच्या भाषिक पार्श्वभूमीची चिंता न करता बँकिंग सेवा सर्वांसाठी उपलब्ध होण्याची खात्री करण्याचा प्रयत्न उभय घटकांमधील हे सहकार्य करत आहे. या सहकार्याव्दारे सर्वसमावेशकतेला चालना मिळाली असून आर्थिक क्षेत्रात वापरकर्त्या ग्राहकांचा सहभाग वाढण्यासाठी एक नवीन मापदंड आम्ही स्थापित करत आहे.”
आरबीआयएचचे सीईओ राजेश बन्सल या उपक्रमाचे कौतुक करताना म्हणाले आहे की, “भारतासारख्या वैविध्यपूर्ण राष्ट्रात, खऱ्या डिजिटल आर्थिक समावेशात आपल्या लोकांच्या भाषिक विविधतेचा समावेश असणे अतिशय गरजेचे आहे. भाषिनीसारख्या एआय आधारित पर्यायाव्दारे पाठबळ मिळालेली स्थानिक भाषेतील बँकिंग ही केवळ एक नवकल्पना नाही तर, डिजिटल क्रांतीचा अब्जावधी भारतीयांना फायदा होईल, याची हमी देण्यासाठी ती एक आवश्यकता आहे. भाषिनी आणि फेडरल बँक यांच्यातील या भागीदारीला पाठिंबा देताना आम्हाला अभिमान वाटतो आणि ही भागीदारी डिजिटल वित्तीय सेवा अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक बनवण्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.