फोटो सौजन्य- सोशल मीडिया
काल वसुबारस होते कालपासूनच देशात दिवाळी सणाला सुरुवात झाली. आज धनत्रयोदशी असल्याने आज कोट्यावधी भारतीय सोने चांदी खरेदी करतात. आजचा दिवस सोने चांदी खरेदीसाठी शुभ मानला जातो. मात्र आजच नव्हे तर सोने चांदी खरेदी करण्यासाठी दिवाळीचे पुढील 3-4 दिवस बाजारपेठेत मोठी वर्दळ पाहायला मिळते. आता हीच सोने चांदीची खरेदी तुम्ही ब्लिंकिट, स्विगी इंस्टामार्ट, झेप्टो आणि बिगबास्केट सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे करु शकतात आणि अवघ्या 10 मिनिटामध्ये ही सोने चांदीची नाणी तुम्हाला घरपोच केली जाणार आहे.
या ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने दिलेल्या या सेवेमुळे तुम्हाला सराफा बाजारात जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ज्वेलेरीच्या दुकानामध्ये असणारी गर्दी तुम्हाला टाळता येणार आहे. या प्लॅटफॉर्मने अनेक मोठ्या ज्वेलेरींच्या ब्रॅंडसोबत भागीदारी केली आहे.
या ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मनी मलबार गोल्ड अँड डायमंड्स, मुथूट एक्झिम आणि जार यांच्यासोबत सणासुदीच्या हंगामासाठी विविध नाणी ऑफर करण्यासाठी सहकार्य केले आहे. तुम्ही, जारची २४ कॅरेट सोन्याची नाणी 0.1g ते 1g पर्यंतच्या मूल्यांमध्ये उपलब्ध असलेली आणि मलबारची चांदीची नाणी 999 शुद्धतेसह, 5g ते 20g पर्यंत खरेदी करू शकतात.
झेप्टो
या प्लॅटफॉर्म मलबार आणि ऑगमॉन्ट ज्वेलर्सचे 24K 999 सोन्याची नाणी 0.1 ग्रॅम, 0.5 ग्रॅम, 0.25 ग्रॅम आणि 1 ग्रॅम वजनात उपलब्ध आणि 999 शुद्धता 10 ग्रॅम चांदीची नाणी ऑफर करतात.
ब्लिंकिट
ब्लिंकिटवर मलबार गोल्ड अँड डायमंड्स आणि जोयालुक्कास यांची नाणी उपलब्ध आहेत. उपलब्ध पर्यायांमध्ये मलबारचे 24K देवी लक्ष्मी सोन्याचे नाणे 1g आणि 99.9% शुद्धतेसह 10g लक्ष्मी गणेश चांदीचे नाणे समाविष्ट आहे.
टाटा बिगबास्केट
बिगबास्केटवर टाटाचाच ज्वेलर्स ब्रॅंड तनिष्क यांच्याशी सहयोग केला असून ग्राहकांना सोन्याची आणि चांदीची नाणी उपलब्ध करून दिली आहेत. उपलब्ध वस्तूंमध्ये लक्ष्मी गणेश चांदीचे नाणे 10 ग्रॅम, 999.9 शुद्धता, 22 कॅरेट सोन्याचे नाणे 1 ग्रॅम, आणि लक्ष्मी मोटीफ 1 ग्रॅम असलेले 22 कॅरेट सोन्याचे नाणे समाविष्ट आहे.
ऑनलाइन सोने आणि चांदीच्या नाण्यांची ऑर्डर कशी करायची
1: तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर असलेले Zepto, BigBasket, Swiggy इत्यादी ॲप उघडा.
2: त्यामध्ये “धनतेरस” किंवा “उत्सव” विभाग शोधा.
3: त्यानंतर तुम्हाला सोने आणि चांदीच्या वेगवेगळी नाणी दिसतील त्यातून खरेदी करण्याची नाणी निवडा.
4: पुढे जाण्यासाठी तुमचा डिलिव्हरी पत्ता आणि इतर आवश्यक असलेला तपशील जोडा.
5: त्यानंतर खरेदीचे पेमेंट करून तुमच्या ऑर्डरची पुष्टी करा.
6: तुम्ही निवडलेले सोन्याचे किंवा चांदीचे नाणे काही मिनिटांत तुमच्या दारात येईल.
अशारितीने ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकतात आणि वर्दळ टाळता घरबसल्या डिलिव्हरी मिळू शकते.