Todays Gold-Silver Price: कधी झळाळी, कधी घसरण! 2025 मध्ये सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठे चढउतार, जाणून घ्या आजचे दर
Ayushman Bharat Yojana: PMJAY मध्ये गुजरात देशात अव्वल; १.२ कोटी कुटुंबांना मिळाले मोफत उपचार
भारतात 19 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,485 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,361 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,114 रुपये होता. भारतात 19 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,23,610 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,34,850 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,140 रुपये होता. भारतात 19 डिसेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 211.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,11,100 रुपये होता.
गेल्या दोन दिवसांतील सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतींचा विचार केला तर दरात घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत काही प्रमाणात घसरण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, केरळ आणि कोलकाता या शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,22,990 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,34,170 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,00,630 रुपये आहे. दिल्ली आणि चंदीगड या शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,23,140 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,34,320 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,00,780 रुपये आहे. नाशिक शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,23,020 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,34,200 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,00,660 रुपये आहे.
2025 या संपूर्ण वर्षभरात सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळाले. काहीवेळा दरात मोठी वाढ झाली तर काहीवेळा सोन्याच्या दरात घसरण देखील झाली. सोन्या – चांदीचे दर बदलण्यामागे अनेक कारणं आहेत. जगात आर्थिक अनिश्चितता वाढली आहे. युद्ध, मंदीची भीती, शेअर बाजारात घसरण यासांरसख्या परिस्थितीत अनेक लोकं सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सोनं आणि चांदी खरेदी करण्याला प्राधान्य देतात. अशावेळी मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होते. भारत परदेशातून सोनं-चांदी आयात करतो. त्यामुळे डॉलर आणि रुपया यांच्या किंमतीचा परिणाम भारतात होतो, आणि सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत वाढ होते. याशिवाय जेव्हा महागाई वाढते, तेव्हा असे अनेक लोकं असतात जे सोन्यात-चांदीत गुंतवणूक करतात, त्यामुळे सोन्या-चांदीची मागणी वाढते आणि परिणामी किंमतीत देखील वाढ होते.
| शहरं | 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर |
|---|---|---|---|
| चेन्नई | ₹1,22,990 | ₹1,34,170 | ₹1,00,630 |
| बंगळुरु | ₹1,22,990 | ₹1,34,170 | ₹1,00,630 |
| पुणे | ₹1,22,990 | ₹1,34,170 | ₹1,00,630 |
| केरळ | ₹1,22,990 | ₹1,34,170 | ₹1,00,630 |
| कोलकाता | ₹1,22,990 | ₹1,34,170 | ₹1,00,630 |
| मुंबई | ₹1,22,990 | ₹1,34,170 | ₹1,00,630 |
| नागपूर | ₹1,22,990 | ₹1,34,170 | ₹1,00,630 |
| हैद्राबाद | ₹1,22,990 | ₹1,34,170 | ₹1,00,630 |
| जयपूर | ₹1,23,140 | ₹1,34,320 | ₹1,00,780 |
| चंदीगड | ₹1,23,140 | ₹1,34,320 | ₹1,00,780 |
| लखनौ | ₹1,23,140 | ₹1,34,320 | ₹1,00,780 |
| दिल्ली | ₹1,23,140 | ₹1,34,320 | ₹1,00,780 |
| नाशिक | ₹1,23,020 | ₹1,34,200 | ₹1,00,660 |
| सुरत | ₹1,23,040 | ₹1,34,220 | ₹1,00,680 |






