फोटो सौजन्य: iStock
पूर्वीपासूनच सोन्यात केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीकडे एक सुरक्षित आणि कमी जोखीम असणारी गुंतवणूक म्हणून पहिले जाते. त्यात आता गुंतवणूकर फिजिकल गोल्डपेक्षा डिजिटल गोल्डमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक करत आहे.
मागील काही दिवसांपासून सोन्याने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. खासकरून ज्यांनी काही वर्षांपूर्वी Gold ETF मध्ये गुंतवणूक केली, त्यांना तर धमाकेदार रिटर्न्स मिळाले आहेत.
मागील तीन महिन्यांत, गोल्ड ईटीएफने सरासरी 23 टक्क्यांचा परतावा दिला आहे. यापैकी, UTI Gold ETF ने सर्वाधिक 27.19 टक्क्यांचा परतावा दिला, तर LIC MF Gold ETF ने 23.40 टक्क्यांचा, Kotak Gold ETF ने 22.96 टक्क्यांचा आणि Nippon India ETF Gold BeES ने 22.94 टक्क्यांचा परतावा दिला. सर्वात कमी परतावा टाटा गोल्ड ईटीएफकडून आला, जो अंदाजे 22.25 टक्क्यांचा होता.
AI च्या जगात अंबानींची मोठी एन्ट्री! रिलायन्सने META सोबत मिळवला हात, ८५५ कोटींची नवी कंपनी स्थापन!
कोटक म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर सतीश डोंडापाटी यांच्या मते, एप्रिल 2025 पासून सुरू झालेली ही रॅली अनेक कारणांमुळे मजबूत राहिली. यामध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून संभाव्य व्याजदर कपातीची अपेक्षा, जिओपॉलिटिक्स तणावात वाढ, सेंट्रल बँकांची सातत्याने होत असलेली खरेदी, आणि सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी या कारणांचा समावेश आहे.
अलीकडे आलेल्या $250–$300 च्या उछालामागे अमेरिकन सरकारच्या शटडाउनशी संबंधित चिंता प्रमुख कारण ठरल्या. मात्र, गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुक केल्यानंतर आणि अमेरिकन बॉण्ड यिल्ड्स तसेच डॉलर मजबूत झाल्यानं सोन्याच्या किमतींमध्ये किंचित घसरण झाली.
गेल्या दोन आठवड्यांत Gold ETF ची गती मंदावली आहे. सरासरी फक्त 0.70% इतकाच परतावा मिळाला आहे. UTI Gold ETF ने सर्वाधिक 4.26% नफा दिला, तर Aditya Birla Sun Life Gold ETF ने केवळ 0.12% परतावा दिला.
मात्र गेल्या आठवड्यात परिस्थिती अधिक कमजोर झाली असून, सरासरी Gold ETF मध्ये 6.11% इतकी घसरण दिसली आहे. Tata Gold ETF मध्ये सर्वाधिक 6.81% घट झाली, तर UTI Gold ETF ने सर्वात कमी 2.64% नुकसान दाखवले आहे.
पण आता, ही तेजी मंदावताना दिसते. गेल्या काही आठवड्यांत गोल्ड ईटीएफमध्ये तीव्र चढ-उतार दिसून आले आहेत. तज्ञांचा असा विश्वास आहे की नफा बुकिंगमुळे गुंतवणूकदारांनी काही सुधारणा केल्या आहेत, ज्यामुळे किंमतींमध्ये घट झाली आहे.
कोटक म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर सतीश डोंडापाटी यांचा सल्ला आहे की, सध्या गुंतवणूकदारांनी एकरकमी (lump-sum) गुंतवणुकीपासून दूर राहावं. त्याऐवजी SIP (Systematic Investment Plan)** किंवा STP (Systematic Transfer Plan)च्या माध्यमातून हळूहळू गुंतवणूक करावी. असे केल्यास किंमतींतील चढउतारांचा परिणाम कमी होईल आणि सरासरी खर्चावर अधिक चांगला परतावा मिळण्याचीशक्यता वाढेल.






