उद्या रविवार, १ फेब्रवारी २०२६ रोजी देशात नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते हे नवीन बजेट सादर केले जाणार असून याचा रोजच्या जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. नव्या वर्षात तुम्हीही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नवे बजेट तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरु शकते. सोने, चांदी, प्लॅटिनम आणि रंगीत रत्ने यांसारख्या कच्च्या मालावरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी सर्वात प्रमुख आहे. आयात शुल्क कमी केल्याने दागिन्यांच्या किमती कमी होऊ शकतात आणि निर्यात वाढू शकते. सरकारच्या धोरणात्मक निर्णयामुळे उद्योगालाच नाही तर ग्राहकांनाही सोनं खरेदी करणं सोईचं ठरेल.
Budget 2026 : बजेटनंतर सोन्याची किंमत होणार स्वस्त? सरकारच्या या घोषणांमुळे गोल्ड शॉपिंग होणार सोयीची

देशांतर्गत बाजारपेठेत GST देखील प्रमुख मुद्दा आहे. दागिन्यांवरील सध्याचा ३% GST १ ते १.२५% करण्याची मागणी होत आहे.

उद्योगाचे म्हणणे आहे की वाढत्या किमतींमुळे ग्राहक खरेदी पुढे ढकलत आहेत. GST चे दर कमी झाल्यास सोनं स्वस्त होईल आणि यामुळे मागणी वाढू शकते.

कस्टम प्रक्रिया सोपी करण्याचीही मागणी केली जात आहे. सध्या, अवघड तपासणी आणि कागदपत्रांमुळे निर्यातीला विलंब होतो. डिजिटल कागदपत्रे,रिस्क बेस व्हेरिफेशन आणि जलद मंजुरी लागू केल्याने व्यवसाय करण्याची सोय सुधारेल आणि डिलिव्हरी टाईम कमी होईल.

यासहच कमी किमतीच्या दागिण्यांसाठी नियंत्रित EMI पर्याय सुरु करण्याची मागणी केली जात आहे. यामुळे ग्राहकांना कोणत्याही दबावाशिवाय सोनं खरेदी करता येईल.

भारतात सुमारे २४,००० टन सोनं असल्याचा अंदाज आहे. अर्थसंकल्पात नवी धोरणे आणून जुने किंवा न वापरलेले सोने औपचारिक प्रणालीत आणावीत अशी अपेक्षा केली जात आहे. यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि रियूजला प्रोत्साहन मिळेल.






