Todays Gold-Silver Price: ग्राहकांना मोठा दिलासा! सलग तिसऱ्या दिवशी सोनंचांदी झालं स्वस्त, ट्रम्पच्या घोषणेचा होतोय परिणाम
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 50 टक्के कर लादण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र जर या आठवड्यातील सोन्याच्या किंमतींचा विचार केला तर या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या किंमतीत घसरण सुरप झाली आहे. केवळ सोन्याच्याच नाही तर चांदीच्या किंमतीत देखील घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाचा उलट परिणाम होत आहे का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. कारण सोन्याच्या किंमतीत निश्चित वाढ होईल, असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी वर्तवला होता. मात्र आज सलग तिसऱ्या दिवशी देशांतर्गत सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत.
13 ऑगस्ट रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,139 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,294 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,604 रुपये आहे. 12 ऑगस्ट रोजी काल भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,227 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,374 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,670 रुपये होता.
भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,940 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,390 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,040 रुपये आहे. भारतात काल 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,740 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,02,270 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,700 रुपये होता. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 114.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,14,900 रुपये आहे. भारतात काल चांदीचा भाव प्रति ग्रॅम 116.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,16,900 रुपये होता. (फोटो सौजन्य – istockphoto)
शहरं | 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर |
---|---|---|---|
चेन्नई | ₹92,940 | ₹1,01,390 | ₹76,040 |
बंगळुरु | ₹92,940 | ₹1,01,390 | ₹76,040 |
पुणे | ₹92,940 | ₹1,01,390 | ₹76,040 |
मुंबई | ₹92,940 | ₹1,01,390 | ₹76,040 |
केरळ | ₹92,940 | ₹1,01,390 | ₹76,040 |
कोलकाता | ₹92,940 | ₹1,01,390 | ₹76,040 |
हैद्राबाद | ₹92,940 | ₹1,01,390 | ₹76,040 |
नागपूर | ₹92,940 | ₹1,01,390 | ₹76,040 |
दिल्ली | ₹93,090 | ₹1,01,540 | ₹76,170 |
चंदीगड | ₹93,090 | ₹1,01,540 | ₹76,170 |
लखनौ | ₹93,090 | ₹1,01,540 | ₹76,170 |
जयपूर | ₹93,090 | ₹1,01,540 | ₹76,170 |
नाशिक | ₹92,970 | ₹1,01,420 | ₹76,720 |
सुरत | ₹92,990 | ₹1,01,440 | ₹76,080 |