महिन्याच्या सुरुवातीलाच दिलासादायक बातमी! एलपीजी गॅस सिलेंडर झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन दर (फोटो सौजन्य - Pinterest)
LPG Gas Cylinder Price Marathi News: दर महिन्याच्या पहिल्या दिवशी, तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती अपडेट करतात. १ मे २०२५ रोजी येणाऱ्या कामगार दिनानिमित्त ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गॅस कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १७ रुपयांची कपात केली आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात झाल्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
१ मे २०२५ पासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडर ची किंमत १७ रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
दिल्लीत आता १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर १,७४७.५० रुपयांना उपलब्ध आहे.
१ मे पासून कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत १,८५१.५० रुपये झाली आहे.
आजपासून मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १,६९९ रुपये झाली आहे.
१ मे २०२५ पासून चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत १,९०६.५० रुपये झाली आहे.
घरगुती वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. ८ एप्रिल रोजी १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली. एप्रिल महिन्यात ही वाढ १ वर्षांहून अधिक काळानंतर झाली. एलपीजीच्या किमतींचा थेट परिणाम घराच्या बजेटवर होतो.
– दिल्ली: ८५३ रुपये
– मुंबई: ८५२.५० रुपये
– बेंगळुरू: ८५५.५० रुपये
– हैदराबाद: ९०५ रुपये
जागतिक कच्च्या तेलाच्या किमती आणि रुपया-डॉलर विनिमय दरानुसार दरमहा ८५६ रुपयांच्या एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलतात. अलिकडच्या काही महिन्यांत, जागतिक तेल बाजारात चढ-उतार दिसून आले आहेत, ज्याचा परिणाम व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतींवरही दिसून येत आहे. याशिवाय, अमेरिका-चीन व्यापार तणाव आणि ओपेक प्लसच्या उत्पादन वाढवण्याच्या योजनेमुळेही तेलाच्या किमतींवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्याने रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि इतर अन्न व्यवसायांशी संबंधित लोकांना दिलासा मिळेल. हे व्यवसाय त्यांच्या दैनंदिन कामांसाठी व्यावसायिक सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.