फोटो सौजन्य - Social Media
एचडीएफसी म्युच्युअल फंड या भारतातील आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपनीने देशाच्या विविध भागांत मिळून २५ नव्या शाखांचे उद्घाटन केले आहे. हा उपक्रम कंपनीच्या सध्या सुरू असलेल्या व्याप्ती वाढवण्याच्या आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सोपी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या नव्या शाखा म्हणजे बिझनेस सेंटर्स भरतपूर, भुसावळ, वाराचा, बोपाळ, वाकड, चित्तोडगढ, जालना, अझमगढ, पुर्णिया, सीतापूर, बस्ती, अराह, बदलापूर, काशीपूर, फिरोझपूर, बरसात, ब्रम्हपोर (मुर्शीदाबाद), बोलापूर, कोल्लम, खमाम, होसूर, हसन, नागेरकॉइल, विझानागरम आणि तंजावर येथे सुरू करण्यात येणार आहेत.
एचडीएफसी एएमसीच्या विस्तारामुळे भारतातील आर्थिक सेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. नव्या शाखांच्या स्थापनेमुळे, ही कंपनी देशभरात सहज उपलब्ध असलेल्या आघाडीच्या वेल्थ क्रिएटर्सपैकी एक ठरली आहे. हे पाऊल केवळ कंपनीच्या वाढत्या व्यवसायाची जाणीव करून देत नाही, तर ‘प्रत्येकासाठी संपत्ती निर्मिती’ या उद्दिष्टाचा पाया भक्कम करते. या विस्तारामुळे एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे शाखा नेटवर्क आता देशभरात २५० शाखांपर्यंत पोहोचले आहे, ज्यामुळे आर्थिक सेवांचा लाभ शहरी तसेच निम-शहरी भागांतील नागरिकांना अधिक जवळून मिळू शकतो. आर्थिक साक्षरता वाढवण्याचे आणि लहान शहरांपासून उदयोन्मुख आर्थिक केंद्रांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट या उपक्रमातून स्पष्ट होते. हे केवळ शाखा विस्तार नाही, तर सेवांच्या माध्यमातून त्या भागातील आर्थिक साक्षरतेची पातळी उंचावण्याचा प्रयत्न आहे, ज्यामुळे दुर्लक्षित बाजारपेठांनाही मुख्य प्रवाहात आणले जाऊ शकते.
या उपक्रमाची योजना सेबीच्या भारतात आर्थिक सर्वसमावेशकता वाढवण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे. आर्थिक समावेशकतेच्या दृष्टीने ही मोठी उडी असून, त्यामुळे गुंतवणूकदारांना आपले आर्थिक ध्येय साध्य करण्यास मदत होईल. याबाबत एचडीएफसी एएमसी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी नवनीत मुनोत यांनी सांगितले की, “एचडीएफसी एएमसीमध्ये आम्ही प्रत्येक भारतीयासाठी संपत्ती निर्मितीचे साधन उपलब्ध करून देण्याचे ध्येय बाळगले आहे. देशभरात नव्या २५ शाखा सुरू करण्याच्या उपक्रमामुळे आम्ही या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी वचनबद्ध आहोत. प्रत्येक भारतीयाला सक्षम करणाऱ्या व त्यांना आर्थिक विकासगाथेत सामील होण्याची संधी देणाऱ्या गुंतवणुकीच्या योजना सादर करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू.”
शाखा विस्ताराचा हा उपक्रम फक्त आर्थिक सेवा प्रदान करण्यापुरता मर्यादित नाही, तर तो आर्थिक साक्षरता वाढवण्याचा आणि गुंतवणूकदारांना सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागांतील नागरिकांना आर्थिक नियोजनाबाबत अधिकाधिक शिक्षित करण्याचा कंपनीचा मानस आहे. त्यामुळे कंपनी केवळ भारतातील आघाडीची म्युच्युअल फंड कंपनी राहणार नाही, तर एक विश्वासार्ह आर्थिक साथीदार म्हणूनही आपले स्थान निर्माण करेल.