सुट्ट्यांच्या काळात सायबर स्कॅमपासून कसे वाचायचे? फेडएक्सचा महत्त्वाचा इशारा (Photo Credit - X)
कशा प्रकारे केली जाते फसवणूक? (Holiday Scams)
सायबर चोरटे प्रतिष्ठित कंपन्यांचे लोगो आणि अधिकृत भाषेचा वापर करून हुबेहूब खरे वाटणारे संदेश पाठवतात. तुमचे पार्सल अडकले आहे किंवा डिलिव्हरीसाठी उशीर होत आहे, असे सांगून लिंकवर क्लिक करायला भाग पाडले जाते. कॅशबॅक किंवा बक्षीस मिळवण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करायला सांगितले जाते. प्रत्यक्षात कोड स्कॅन करताच तुमच्या खात्यातून पैसे चोरीला जातात.
अविश्वसनीय ऑफर्स
मोबाईल किंवा गॅजेट्सवर मोठ्या सवलती देणाऱ्या बनावट वेबसाईट तयार केल्या जातात, जिथे पैसे भरल्यानंतर वस्तू कधीच मिळत नाही. बँक खाते ब्लॉक होण्याची धमकी देऊन ओटीपी (OTP) किंवा गोपनीय माहिती मागितली जाते.
सायबर स्मार्ट राहण्यासाठी या ‘स्मार्ट’ सवयी लावा
फेडएक्सने नागरिकांना “थांबा, विचार करा आणि मगच कृती करा” हा मोलाचा सल्ला दिला आहे:
१. लिंकवर क्लिक करू नका: अनोळखी किंवा फॉरवर्ड केलेल्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी अधिकृत ॲप किंवा वेबसाईटवर जाऊन खात्री करा.
२. क्यूआर कोड स्कॅन करताना सावध राहा: पैसे मिळवण्यासाठी कोणताही क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नसते, हे लक्षात ठेवा.
३. गोपनीय माहिती शेअर करू नका: तुमचा ओटीपी, बँक तपशील किंवा कार्ड क्रमांक कोणालाही देऊ नका. बँका किंवा कुरिअर कंपन्या कधीही अशी माहिती मागत नाहीत.
४. सुरक्षा कवच: आपल्या सर्व महत्त्वाच्या खात्यांना ‘टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन’ (2FA) लावून सुरक्षित करा.
तक्रार कुठे करावी?
फेडएक्सच्या मते, फसवणूक करणारे नेहमीच गुंतागुंतीच्या पद्धती वापरत नाहीत; उलट, घाईघाईत कोणतीही तपासणी न करता निर्णय घेणाऱ्या लोकांनाच ते लक्ष्य करतात. त्यामुळे या हॉलिडे सीझनमध्ये, एखाद्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी, पेमेंट करण्यापूर्वी किंवा काहीही स्कॅन करण्यापूर्वी क्षणभर थांबा आणि दोनदा विचार करा. सायबर फसवणुकीचा संशय आल्यास राष्ट्रीय सायबर फ्रॉड हेल्पलाइन 1930 वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार नोंदवा. फेडएक्स सायबर जागरूकता आणि शिक्षण उपक्रमांना सातत्याने पाठिंबा देत असून, ग्राहक, लहान व्यवसाय आणि समुदायांना आजच्या वेगवान डिजिटल अर्थव्यवस्थेत सुरक्षितपणे काम करता यावे, यासाठी प्रयत्नशील आहे.
हे देखील वाचा: Axis Mutual Fund कडून ‘गोल्ड अँड सिल्व्हर पॅसिव्ह फंड’ ऑफ फंड्सची घोषणा; 20 तारखेला…






