दिल्ली आणि मुंबईनंतर आता या शहरात सुरु होणार Apple चं तिसरं रिटेल स्टोर, भाड्याची किंमत वाचून कपाळाला लावाल हात
टेक जायंट Apple भारतात आपली पकड मजबूत करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. अमेरिकेत आयफोनची निर्मिती केली नाही, तर आयफोनवर 25 टक्के कर आकारला जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी Apple ला दिला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणानंतर टिम कूक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. टिम कूक आणि त्यांच्या कंपनीने असा निर्णय घेतला आहे की, भारतात Apple चं तिसरं रिटेल स्टोर सुरु केलं जाणार आहे.
Online Game रिकामंं करू शकतात तुमचं बँक अकाऊंट; कधीही करू नका या चुका
खरं तर टिम कूक यांनी घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतरही कंपनीने भारतात Apple चं तिसरं रिटेल स्टोर सुरु करण्याची तयारी केली आहे. आता लवकरच बंगळुरुच्या Phoenix Mall of Asia, Hebbal मध्ये हे स्टोर ओपन केलं जाणार आहे. या नवीन स्टोरमुळे कंपनीची भारतातील पकड अधिक मजबूत होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मुंबई BKC आणि दिल्ली Saket या ठिकाणी यापूर्वीच Apple रिटेल स्टोर सुरु करण्यात आलं आहे. आगामी स्टोर हे भारतातील तिसरं रिटेल स्टोर असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Apple ने हेब्बल मध्ये Phoenix Mall च्या फर्स्ट फ्लोरवर रिटेल स्पेस घेतलं आहे. बंगळुरुमधील स्टोरचे माप Select Citywalk Mall स्टोर इतकेच असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हे मुंबईच्या Jio World Drive च्या 20,800 स्क्वायर फीट स्टोरपेक्षा लहान आहे.
समोर आलेल्या अहवालात असं सांगण्यात आलं आहे की, भाडेपट्टा करारात वार्षिक 2.09 करोड रुपयांचं एग्रीमेंट समाविष्ट आहे, जो दरमहा 17.4 लाख रुपये होतो. कंपनी पहिल्या तीन वर्षांसाठी 2 टक्के आणि त्यानंतर 2.5 टक्के रेवेन्यू शेयर देखील देणार आहे. रेवेन्यू बेस्ड हिस्सा वार्षिक मूळ भाड्याच्या दुप्पट मर्यादित आहे. अहवालात देखील अंस सांगण्यात आलं आहे की, कंपनीने 1.046 करोड रुपये डिपॉजिट दिलं आहे. भाडेपट्ट्याच्या अटींनुसार, दर तीन वर्षांनी भाडे 15 टक्क्यांनी वाढेल.
आता WhatsApp वरून घेता येणार ब्रेक, डेटाही राहणार सुरक्षित… लवकरच येतंय अनोखं फीचर
Apple च्या अर्निंग्स कॉल्समध्ये टिम कूक यांनी पुष्टि केली होती की भारतात एक नवीन रिटेल स्टोर सुरु करण्याची योजना आहे आणि हे स्टोर या वर्षी सुरु केलं जाण्याची अपेक्षा आहे. रिपोर्ट्सनुसार, पुण्यासह काही शहरांमध्ये अॅपल स्टोअर्स सुरु केले जाणार आहेत. याशिवाय, कंपनी दिल्ली एनसीआर आणि मुंबईमध्ये देखील नवीन ठिकाणांचा विचार करत आहे. भारत आता अॅपलसाठी केवळ विक्री बाजारपेठ राहिलेली नाही तर एक महत्त्वाचे उत्पादन केंद्रही बनत आहे. जून 2025 पासून अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या बहुतेक आयफोनवर “मेड इन इंडिया” टॅग असेल, असे अॅपलने अलीकडेच म्हटले आहे. तर आयपॅड, मॅकबुक, अॅपल घड्याळे आणि एअरपॉड्स व्हिएतनाममधून अमेरिकेला पाठवले जातील.