Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावध व्हा! शेअर बाजारात घसरण होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिला इशारा
जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज २५ जुलै रोजी भारतीय शेअर बाजार निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. एवढंच नाही, तर तज्ज्ञांनी असा देखील इशारा दिला आहे की, आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होऊ शकते. त्यामुळे आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांनी सावध भुमिका बाळगण्याची आवश्यकता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड आज देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९९३ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १०२ अंकांनी कमी होता. दैनिक चार्टवर सेन्सेक्सने मंदीचा इशारा दिला आहे.
गुरुवारी, २४ जुलै रोजी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, बेंचमार्क निफ्टी ५० २५,१०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स ५४२.४७ अंकांनी म्हणजेच ०.६६% ने घसरून ८२,१८४.१७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १५७.८० अंकांनी म्हणजेच ०.६३% ने घसरून २५,०६२.१० वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक १४४.४० अंकांनी किंवा ०.२५% ने घसरून ५७,०६६.०५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी गुंतवणूकदारांना १०० पेक्षा कमी किमतींत खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये प्रोझोन रिअल्टी , बालाजी टेलिफिल्म्स आणि एल्प्रो इंटरनॅशनल यांचा समावेश आहे. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना बंधन बँक , आरईसी आणि हबटाऊन या तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. रेलिगेअर ब्रोकिंग येथील संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी आज गुंतवणूकदारांना अल्पावधीसाठी पेटीएम , इंडियन बँक आणि जिंदाल स्टीलचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे, आणि प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज गुंतवणूकदारांना आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये इटरनल लिमिटेड, फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड, टाटा केमिकल्स लिमिटेड, झायडस वेलनेस लिमिटेड, सूर्या रोशनी लिमिटेड आणि वेल्सपन लिमिटेड यांचा समावेश आहे.
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, अदानी एंटरप्रायझेस, जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स, एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स, इंडियन एनर्जी एक्सचेंज, आरईसी, सायंट, टॅनला प्लॅटफॉर्म, फिनिक्स मिल्स, केफिन टेक्नॉलॉजीज, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, यूटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपनी या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.
२५ जुलै, शुक्रवार रोजी किमान ८५ कंपन्या त्यांचे उत्पन्न अहवाल जाहीर करणार आहेत. यामध्ये बजाज फिनसर्व्ह, बँक ऑफ बडोदा, सिप्ला, श्रीराम फायनान्स, एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया यासारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.