इन्कम टॅक्स न्यू रेजिम
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे आणि आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. आयकर विभाग बऱ्याच काळापासून करदात्यांना सूचित करत आहे की त्यांनी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी शेवटच्या तारखेपूर्वी त्यांचे आयटीआर दाखल करावे.
दरम्यान, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी बुधवारी सांगितले की, चालू सत्रात आतापर्यंत एकूण 4 कोटी रिटर्न भरले गेले आहेत. तर आतापर्यंत दाखल केलेल्या एकूण ITR पैकी 66 टक्क्यांहून अधिक करदात्यांनी नवीन कर प्रणाली निवडली आहे. त्यामुळे तुम्हाला जर कोणत्या करप्रणालीतून फायदा मिळू शकतो जाणून घ्यायचे असेल तर हा लेख नक्की वाचा. (फोटो सौजन्य – iStock)
काय म्हणाले तज्ज्ञ
नव्या करप्रणालीत वाढ
तज्ज्ञ रवी अग्रवाल यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, सरकार आणि प्रत्यक्ष कर विभागाचे लक्ष आयटीआर दाखल करणे आणि आयकर विभागासह इतर व्यवसाय करणे यासह कर प्रक्रियेच्या ‘सोप्या प्रक्रियेवर’ आहे. तर यावेळी 66 टक्के लोकांनी नवी कर प्रणाली निवडली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मागच्या वर्षीच्या तुलनेत ITR मध्ये वाढ
अग्रवाल म्हणाले, “सरकारची कल्पना अशी आहे की तुम्ही जितके सोपे कराल तितके लोकांना त्याचे पालन करणे सोपे जाईल, ज्यामुळे कराचा भरणा करण्यात वाढ होईल,” तर पुढे त्यांनी सांगितले की, “आजपर्यंत दाखल केलेल्या रिटर्नची (ITR) संख्या गेल्या वर्षी याच कालावधीत भरलेल्या रिटर्नपेक्षा कितीतरी जास्त आहे हे यावरूनही दिसून येते.”
कशी आहे तुलना
अग्रवाल यांच्या सांगण्याप्रमाणे, गेल्या वर्षी 25 जुलै रोजी चार कोटी आयटीआरचा आकडा पार केला होता, परंतु यावेळी 22 जुलैच्या रात्री हा आकडा पार झाला. सीबीडीटी चेअरमन म्हणाले की नवीन कर प्रणाली सध्या् ‘चांगले आकर्षण’ मिळवत आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे 66 टक्के लोकांनी त्याचा वापर केल्याचे दिसून येत आहे.
हेदेखील वाचा – आयकराच्या नियमात बदल; तुम्हाला कर परतावा मिळवायचाय? वाचा… ही माहिती!
भविष्यातही फायदा
नव्या करप्रणालीचा भविष्यातही फायदा
त्यांनी यावेळी सांगितले की, “भविष्यात आम्हाला वीन आयटीआर प्रणाली अंतर्गत याचे अधिक फायदे मिळतील अशी अपेक्षा आहे” ते म्हणाले की गेल्या वर्षी 31 जुलैच्या शेवटच्या तारखेपर्यंत सुमारे 7.5 कोटी आयटीआर दाखल केले गेले होते. दरम्यान यावर्षी हा आकडा किती असेल याचीही आता उत्सुकता लागून राहिली आहे.