WEF Annual Meeting: दावोस 2026 मध्ये भारताचा दबदबा! 4 मुख्यमंत्री आणि 100+ CEO राहणार उपस्थित; अंबानी, टाटा, फडणवीस एकाच मंचावर (फोटो-सोशल मीडिया)
WEF Davos 2026: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) दावोस २०२६ मध्ये जागतिक आर्थिक मंचावर भारताकडून ४ मुख्यमंत्री आणि १०० हून अधिक सीईओ उपस्थित राहणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आणि आंध्र प्रदेशचे एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह भारतातील इतर २ मुख्यमंत्री आणि १०० हून अधिक मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ उपस्थित राहणार आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या वार्षिक बैठकीला ते उपस्थित राहतील. ही वार्षिक बैठक पाच दिवस १९ ते २३ जानेवारी २०२६ पर्यंत चालेल आणि सुमारे १३० देशांमधील अंदाजे ३,००० जागतिक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या बैठकीत अंदाजे ६० राष्ट्रप्रमुखांचा समावेश असून अनेक केंद्रीय मंत्री देखील उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत, तेलंगणाचे ए. रेवंत रेड्डी आणि मध्य प्रदेशचे मोहन यादव देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे, उत्तर प्रदेशसह इतर अनेक राज्यांचीही WEF वार्षिक बैठक २०२६ मध्ये उपस्थिती असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा : RBI Repo Rate impact: कमी महागाई, स्वस्त कर्ज आणि मजबूत वाढ तरीही शेतकरी अडचणीत का?
ही बैठक “संवादाची भावना” या थीमखाली होणार असून केंद्रीय मंत्र्यांची नावे लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. भारतातून, जगभरातील प्रभावशाली उद्योगपती म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, टाटा ग्रुपचे एन चंद्रशेखरन, बजाज ग्रुपचे संजीव बजाज आणि जुबिलंट भरतिया ग्रुपचे हरी एस भरतिया हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहे.
दावोसला जाणाऱ्या इतर भारतीय कॉर्पोरेट अधिकाऱ्यांमध्ये अॅक्सिस बँकेचे अमिताभ चौधरी, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे नादिर गोदरेज, जेएसडब्ल्यू ग्रुपचे सज्जन जिंदाल, झेरोधाचे निखिल कामथ, भारती ग्रुपचे सुनील भारती मित्तल, इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी, इन्फोसिसचे सीईओ सलील एस. पारेख, विप्रोचे रिषद प्रेमजी, एस्सारचे सीईओ प्रशांत रुईया आणि पेटीएमचे विजय शेखर शर्मा यांसारख्या व्यावसायिकांचा देखील समावेश आहे.
हेही वाचा : RBI Report: RBI कडून धक्कादायक वास्तव उघड! राज्यांतील आर्थिक असमानता भारताच्या वाढीस धोका निर्माण करणार?
उद्योग आणि व्यापार विभागाचे सचिव अमरदीप सिंग भाटिया यांच्या व्यतिरिक्त, अनेक सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे प्रमुख देखील दावोसला जाणार आहेत, ज्यात गेलचे संदीप कुमार गुप्ता, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष सी.एस. सेट्टी, एनटीपीसीचे गुरदीप सिंग आणि आरईसीचे जितेंद्र श्रीवास्तव यांचा समावेश आहे. जी-७, जी-२० आणि ब्रिक्स देशांसह इतर देशांचे नेते आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख देखील सहभागी होतील.






