श्री. पार्थ जिंदाल हे जेएसडब्ल्यू सिमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. सीएमएच्या ६० वर्षांच्या इतिहासात ते सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून निवडून आले असून, भारतीय सिमेंट उद्योगासमोर उभ्या असलेल्या प्रमुख आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवी ऊर्जा आणि व्यापक दृष्टी देण्याची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
अध्यक्ष म्हणून श्री. जिंदाल धोरणकर्ते, नियामक आणि अन्य संबंधित घटकांसोबत समन्वय साधत सीएमएचा धोरणात्मक अजेंडा पुढे नेण्याची जबाबदारी सांभाळतील. शाश्वत उत्पादन प्रक्रिया, ऊर्जा संक्रमण (डीकार्बनायझेशन) आणि लॉजिस्टिक्सच्या कार्यक्षमतेवर विशेष भर देत, सिमेंट उद्योगाचा सामूहिक आवाज आणि प्राधान्यक्रम मांडणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असेल. सीएमएच्या सदस्यसंख्येचा विस्तार करणे हेही त्यांच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक असेल.
सीएमएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मला अत्यंत आनंद होत आहे. सध्या सिमेंट उद्योग वेगवान पायाभूत सुविधा विकास आणि शाश्वततेच्या गरजा यामध्ये समतोल साधत आहे. केंद्र व राज्य पातळीवरील धोरणकर्त्यांशी सहकार्य अधिक दृढ करत, भारतीय सिमेंट उद्योग जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राहील, तसेच भारताच्या दीर्घकालीन विकास उद्दिष्टांमध्ये आपले योगदान ठामपणे देत राहील, यावर माझा भर राहील. असे सीएमएचे अध्यक्ष श्री. पार्थ जिंदाल यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले.
जे. के. सिमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राघवपत सिंघानिया हे ग्रे आणि व्हाइट सिमेंट उद्योगातील समृद्ध अनुभव असलेले ज्येष्ठ उद्योगनेते आहेत. नव्या पिढीच्या बांधकाम साहित्याच्या संशोधनात त्यांची विशेष रुची आहे. क्षेत्रातील त्यांच्या व्यापक अनुभवाच्या आधारे, उद्योग प्रतिनिधित्व आणि संवाद अधिक मजबूत करत सीएमएची उद्दिष्टे पुढे नेण्यास ते मोलाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सीएमएचे उपाध्यक्ष डॉ. राघवपत सिंघानिया म्हणाले, “सिमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मला सन्मान वाटतो. भारतीय सिमेंट उद्योग सध्या अशा निर्णायक टप्प्यावर उभा आहे, जिथे शाश्वतता, नवोपक्रम आणि स्पर्धात्मकता या तिन्ही बाबी एकत्रितपणे पुढे जाणे आवश्यक आहे. भारत सरकारच्या २०७० पर्यंत नेट झिरो होण्याच्या दृष्टीकोनाशी सीएमए पूर्णपणे सुसंगत आहे. सीएमएच्या सदस्य कंपन्यांसोबत घनिष्ठपणे काम करत, धोरणात्मक कृती अजेंडा पुढे नेण्यासाठी आणि भारताच्या विकास व राष्ट्रनिर्मितीसाठी आपली भागीदारी अधिक बळकट करण्याची माझी अपेक्षा आहे.”
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळून सीएमएला सुसंगत व भविष्याभिमुख नेतृत्व देणार असून, नव्या विचारांना धोरणात्मक स्पष्टतेची जोड देत संघटनेचा धोरणात्मक पाठपुरावा अधिक प्रभावी करतील, अशी अपेक्षा आहे. यामुळे सिमेंट उद्योगाची राष्ट्रनिर्मिती, पायाभूत सुविधा विकास आणि ‘विकसित भारत’कडे भारताच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण भूमिका अधिक ठळक होईल.






