मुंबई : हा तोच सीझन आहे ज्यात आपण जर्सीच्या रंगावरून गट पाडलेले असतात. पण, केएफसी चिकनच्या (KFC Chicken) बकेटमुळे आपण एकत्रही असतो. मोठ्याने चिअर करणं आणि ओरडणं (Cheer Up and Shout) (अगदी केएफसी चिकनच्या शेवटच्या पीससाठीचं भांडणही) तुम्हाला तुमच्या आवडत्या केएफसीमध्ये बरंच काही मिळवून देऊ शकतं, याचा कुणी विचारही केला नसेल.
आता जरा आवाजाचा रियाज करा आणि सर्वात चांगलं ओरडून दाखवा… केएफसी ॲप Howzzat वरील पहिल्यावहिल्या व्हॉईस ॲक्टिव्हेटेड मेगा ऑफरचा लाभ घ्या. केएफसी ॲप डाऊनलोड करा, होम स्क्रीनवरील ‘Howzzat’ बॅनरवर क्लिक करून शक्य तितक्या मोठ्या आवाजात ओरडा Howzzat. कारण, तुम्ही जितक्या मोठ्याने चीअर कराल तितकी मोठी ऑफर मिळेल. यापेक्षा भारी कुठे काय मिळेल, पण अर्थात तुम्ही अधिक भारी ओरडूच शकता!
[read_also content=”भारत-पाक सीमेवर तैनात जवानांचे सत्य: ४ तास झोप, २० वर्षांपर्यंत प्रमोशन नाही; चुकीची शिक्षा जाणून घ्याल तर बसेल धक्का https://www.navarashtra.com/india/truth-of-soldiers-deployed-on-indo-pak-border-4-hours-sleep-no-promotion-for-20-years-punishment-for-mistake-it-will-be-a-shock-nrvb-282271.html”]
या अप्रतिम नव्या फिचरबद्दल केएफसी इंडियाचे सीएमओ मोक्ष चोप्रा म्हणाले, “क्रिकेट मॅचेस आणि केएफसी ही कशी उत्तम जोडी आहे, हे आपण जाणतोच. आता आम्ही ही भागीदारी आणखी पुढे नेली आहे किंवा आपण म्हणू, त्याचे डेसिबल आम्ही काहीसे वाढवले आहेत. क्यूएसआर विभागात अशी सोय पहिल्यांदाच उपलब्ध होत आहे. आम्ही ॲप-एक्स्लुसिव्ह व्हॉइस एनेबल्ड ऑफर सादर केली आहे. यात चाहत्यांना ‘हाऊजॅट’ असं मोठ्याने ओरडण्यास प्रोत्साहन दिलं जात आहे. ते जितक्या मोठ्याने चिअर करतील तितकं अधिक डिस्काऊंट मिळेल. तांत्रिक स्वरुपाची ही अतुलनीय प्रगती म्हणजे आमचे ॲप अधिक दमदार करण्यासाठी टाकलेले पुढचे पाऊल आहे. चला तर मग, तुमच्या आवडत्या टीमला चीअर करा आणि नव्या केएफसी ॲपवर आकर्षक ऑफर्स मिळवा.”
इसोबारसह भागीदारीत तयार केलेले हॉऊजॅट हे फीजर २९ मे पर्यंत केएफसी ॲपवर उपलब्ध असेल. ऑर्डर देताना आता तुम्ही अधिक डिस्काऊंट मिळवू शकता. अगदी तुमच्या टीमच्या खात्यात अधिक स्कोअर वाढत जावा तसा. क्रिकेटच्या या संपूर्ण मोसमात ग्राहकांना ४० टक्क्यांपर्यंत कॅश ऑफ डिस्काऊंटही मिळवता येईल.
मग, आता वाट कसली पाहताय? प्ले स्टोअर/ॲप स्टोअरमधून केएफसी ॲप डाऊनलोड करा आणि स्वत:साठी काही ‘मोठ्या आवाजाचे’ लक्ष्य निश्चित करा. या आवाजाहून अधिक आवाजासाठी मित्रांना आव्हान द्या किंवा दरवेळी केएफसी ॲपवर जाताना स्वत:चाच विक्रम मोडीत काढा. आता तुम्ही चीअर केल्याबद्दल अधिक डिस्काऊंट मिळेल. Howzzat?