(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘पति पत्नी और पंगा’ शो च्या सेटवर अविका गौर आणि मिलिंद चंदवानी यांचा लग्नसोहळा पार पडला. या खास प्रसंगी अनेक नामांकित सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मीका सिंगपासून फराह खान, कृष्णा अभिषेक यांनी धमाल परफॉर्मन्स दिला. आता शोच्या नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये ड्रामाक्वीन राखी सावंतची धडाकेबाज एंट्री पाहायला मिळते आहे.
राखी सावंत खास अविकाच्या लग्नासाठी दुबईहून भारतात आली. प्रोमोमध्ये ती चेहरा लपवलेली दिसत आहे. अभिषेक कुमार विचारतो, “हे कोण आहे? तेव्हा राखी चेहऱ्यावरचा हात काढते आणि अभिषेक आश्चर्यचकित होतो. राखी लगेचच म्हणते, “मला नवरा मिळाला!” हे ऐकल्यावर अभिषेक ने तिथून लगेच पळ काढला.
यानंतर ईशा, गुरमीत, मुनव्वर आणि फहाद अभिषेकचा हात धरून त्याला राखीकडे नेतात. तेव्हा अभिषेक म्हणतो,”अरे भाऊ, मी तर मस्करी करत होतो! मला कुठलीही मुलगी नको!”
‘पायी फुफाटा’ गाण्यानं मनं जिंकल्यावर आता गुजर ब्रदर्सचं ‘तू धाव रे’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा करणार लवकरच लग्न, ‘पति पत्नी और पंगा’ मध्ये केली खास घोषणा!
राखी सावंतने ‘पति पत्नी और पंगा’ या कार्यक्रमात येताच सेटवर धमाल केली. तिने अभिषेक कुमारला पाहून लगेचच हसत-हसत “मला कबूल आहे” असं म्हणत त्याच्याशी मस्करी सुरू केली. यावर मुनव्वर फारुकीनेही तिची गंमत उडवायला सुरुवात केली. नंतर राखीने ‘चिकनी चमेली’ गाण्यावर डान्स करत अभिषेकला छेडलं आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हा मजेशीर क्षण पाहून सगळे हसत होते आणि सेटवर खूप धमाल वातावरण तयार झालं होतं.