कमी पैशात जास्त शेअर्स! सेबी मोठा धक्का देणार (फोटो-सोशल मीडिया)
SEBI Margin reduction: जर तुम्ही शेअर बाजाराच्या रोख रकमेत गुंतवणूक करत असाल तर त्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेअर बाजार नियामक असलेली सेबी आता रोख रकमेच्या व्यवहारांवर आकारले जाणारे मार्जिन कमी करण्याच्या विचारात आहे. म्हणजेच, तुम्ही कमी भांडवलात सुद्धा जास्त शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकता. यामुळे तुमचा बाजारातील सहभाग वाढेल. नियामक कडून मिळालेल्या या संभाव्य सवलतीमुळे केवळ लहान गुंतवणूकदारांचे पैसे वाचतीलच. पण, रोख बाजारपेठेलाही नवीन चालना मिळेल.
सामान्य गुंतवणूकदारांना कमी पैशात जास्त शेअर्स खरेदी करण्याची संधी लवकरच प्राप्त होणार आहे. सेबी रोख रकमेच्या क्षेत्रात आकारले जाणारे मार्जिन कमी करण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना पूर्वीपेक्षा कमी भांडवल गुंतवावे लागेल. मिळालेल्या मीहिती नुसार, सेबीच्या एका प्रमुख समितीने अलीकडेच क्लिअरिंग कॉर्पोरेशन, ब्रोकर्स आणि इतर बाजारातील सहभागींसोबत या प्रस्तावावर चर्चा केली. अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसला तरी, आता औपचारिकपणे चर्चा सुरू झाली आहे.
मार्जिन म्हणजे काय?
सध्या, शेअर मार्केटच्या रोख रकमेच्या गुंतवणुकीसाठी सुमारे २०% मार्जिन आवश्यक असते. यामध्ये दोन शुल्क समाविष्ट करण्यात आले आहे.
सेबीचे लक्ष रोख बाजार मजबूत करणे असून व्यापाराचे प्रमाण वाढवण्यावरही भर देणे आहे. गेल्या तीन वर्षांत रोख बाजाराचे सरासरी दैनिक प्रमाण दुप्पट झाले असले तरी, ते काही तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे. सेबीचे अध्यक्ष तुषार कांता पांडे यांनी सांगितले की, भारतीय भांडवली बाजार मजबूत करण्यासाठी रोख बाजाराचा विस्तार करणे आवश्यक आहे.
सेबीच्या या निर्णयाचे फायदे






