File Photo : Farmers
विधानसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी अगदी काही महिने शिल्लक राहिले आहे. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासोबतच हरियाणा, झारखंड, जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये देखील विधानसभा निवडणुका होणार आहे. मात्र, त्याआधी त्या-त्या राज्य सरकारांची मतदारांना आकर्षित करण्यासाठी चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच महाराष्ट्र सरकारने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. तर आता हरियाणा सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी घोषणा केली आहे.
शेतकरी कर्जमाफीची घोषणा
हरियाणा सरकारने आज (ता.४) आज शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत अधिकृतरीत्या घोषणा केली असून, हरियाणातील सर्व शेतकऱ्यांचे 133 कोटी 55 लाख रुपयांचे कर्ज माफ केले जाणार आहे. याशिवाय राज्य सरकारकडून सर्व पिकांची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. अशी घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी केली आहे. त्यामुळे आता राज्यातील कर्जदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय सैनी यांनी शेतकऱ्यांचे बंद पडलेले ट्यूबवेल दुसऱ्या ठिकाणी घेतले जाऊ शकतील, असेही म्हटले आहे.
(फोटो सौजन्य : istock)
हेही वाचा : हायस्कुलला असतानाच शिक्षण सोडले; तरुणाने 19 व्या वर्षीच उभी केली 136 कोटींची कंपनी!
एमएसपीवर सर्व पिके खरेदी करणारे पहिलेच राज्य
दरम्यान, थानेसर अनाजमंडी येथे भाजपच्या विजय शंखनाद रॅलीत मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी शंख वाजवून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी हरियाणात तिसऱ्यांदा डबल इंजिनचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यावेळी भाजप हरियाणाचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे की, हरियाणा हे पहिले राज्य आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे सर्व पिके ही एमएसपीवर खरेदी केली जात आहे.