Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Rules: 1 जूनपासून LPG नियमांमध्ये मोठे बदल, तुमचाही सिलेंडर होऊ शकतो रद्द…

आशिया खंडात सध्या चांगलाच गोंधळ सुरु आहे. तणावजन्य परिस्थिती असल्याने पुरवठा संकटाचा सामना करावा लागत आहे. यासगळ्या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्य जनतेला कोणत्याही अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी काही विशिष्ट बदल लागू करण्यात आले आहेत. असाच एक बदल १ जूनपासून अंमलात येणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 30, 2026 | 04:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

LPG Rules: आशिया खंडात सध्या चांगलाच गोंधळ सुरु आहे. तणावजन्य परिस्थिती असल्याने पुरवठा संकटाचा सामना करावा लागत आहे. यासगळ्या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्य जनतेला कोणत्याही अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी काही विशिष्ट बदल लागू करण्यात आले आहेत. असाच एक बदल १ जूनपासून अंमलात येणार असून, या बदलामुळे तुमचे घरगुती LPG सिलिंडर कनेक्शन रद्द केले जाण्याची शक्यता आहे. नेमके काय आहेत बदल ? समजून घेऊयात.

June Bank Holidays 2026: आवश्यक कामं उरकून घ्या ! जून महिन्यात तब्बल 11 ते 13 दिवस बँका राहणार बंद

देशात पीएनजी कनेक्शन्सची संख्या वाढत असली, तरीही सरकारने निर्देश जारी करूनही एलपीजी सिलिंडर्सचा वापर मात्र कमी झालेला नाही. मार्च महिन्यापर्यंत ६,५०,००० नवीन पीएनजी जोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या होत्या; असे असूनही, गॅसचा प्रत्यक्ष पुरवठा मात्र अंदाजित प्रमाणापेक्षा १८ टक्क्यांनी कमी राहिला.यावरून हे स्पष्ट होते की, अनेक कुटुंबांनी आपली आधीची एलपीजी जोडणी रद्द न करताच पीएनजी जोडणी करुन घेतली आहे. जरी सरकारने हे स्पष्टपणे नमूद केले होते की, जर एखाद्या कुटुंबाकडे पीएनजी आणि एलपीजी अशा दोन्ही जोडण्या असतील, तर एलपीजी जोडणी रद्द करणे अनिवार्य आहे. असे असूनही, लोक आपली एलपीजी जोडणी रद्द न करताच पीएनजी जोडण्याही मिळवत आहेत.

LPG वापरकर्त्यांची संख्या जवळपास दुप्पट

गेल्या दशकात, LPG वापरकर्त्यांची संख्या जवळपास दुप्पट होऊन ३३.५ कोटींवर पोहोचली आहे; याउलट, PNG वापरकर्त्यांची संख्या मात्र केवळ १.६४ कोटी इतकीच राहिली आहे. ही परिस्थिती पाहता, सरकार यात लवकरात लवकर बदल घडण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे जून महिना सुरू होण्यापूर्वीच कडक नियम लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.

एक कुटुंब, एक कनेक्शन नियम

सुधारित नियमांनुसार, ज्या कुटुंबांकडे आधीपासूनच पीएनजी कनेक्शन आहे, त्यांना त्यांचे LPG कनेक्शन परत करावे लागू शकते. घरगुती सिलिंडरचा गैरवापर, साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्याच्या उद्देशाने, तेल विपणन कंपन्यांनी एकाच वेळी पीएनजी आणि एलपीजी दोन्ही वापरणाऱ्या घरांना ओळखण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सुधारित एलपीजी नियमांनुसार, एकाच पत्त्यावर दोन्ही कनेक्शन ठेवण्यास आता मनाई आहे. पीएनजी पायाभूत सुविधा असलेल्या भागांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी विहित मुदतीत पीएनजी कनेक्शन न घेतल्यास, त्यांचा एलपीजी पुरवठा निलंबित होण्याचा किंवा आपोआप रद्द होण्याचा धोका आहे.

एलपीजी कनेक्शन

ज्या ग्राहकांना पीएनजी कनेक्शन मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत त्यांचे एलपीजी कनेक्शन बंद करणे आवश्यक होते, त्यांना आता सरकारने त्यांचे एलपीजी कनेक्शन पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. ही तरतूद वापरकर्त्यांना फ्लेक्सिब्लिटी देते की, जर ते पीएनजी सेवा उपलब्ध नसलेल्या भागात स्थलांतरित झाले, तर ते नंतरच्या टप्प्यात त्यांचे एलपीजी कनेक्शन पुन्हा सुरू करू शकतील.

जूनपासून LPG सिलिंडरचे रिफिलिंग थांबवले

या महिन्यापासून अंमलात येत असलेल्या निर्णयानुसार, ज्या भागांमध्ये PNG पाइपलाइनचे जाळे उपलब्ध आहे, अशा भागांतील कुटुंबांना आता घरगुती LPG सिलिंडरची नोंदणी किंवा रिफिलिंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. ‘सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन’ कंपन्या आणि ‘ऑइल मार्केटिंग कंपन्या’ यांनी आता त्यांचे डिजिटल डेटाबेस पूर्णपणे एकात्मिक केले आहेत. दरम्यान, PNG जोडण्या घेण्याची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

गॅस सिलिंडर बुकिंगसाठीची मुदत

पुरवठ्यातील कमतरता रोखण्यासाठी आणि गैरवापर टाळण्यासाठी, LPG रिफिलिंगसाठीची ‘लॉक-इन’ मुदत शहरी ग्राहकांसाठी २१ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे; तर ग्रामीण ग्राहकांसाठी ही मुदत ४५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

जोडणी आणि अनुदानाचे नियम

कुटुंबांना दरवर्षी १२ अनुदानित घरगुती सिलिंडर्सची मर्यादा यापुढेही लागू राहील. या मर्यादेव्यतिरिक्त लागणाऱ्या कोणत्याही अतिरिक्त सिलिंडरसाठी बाजारातील प्रचलित दराने शुल्क आकारले जाईल. नवीन LPG जोडण्यांसाठी, आता Security Deposit आणि Setup Fees ज्यामध्ये रेग्युलेटर, पाइप आणि जोडणीच्या कामाचा खर्च समाविष्ट असतो लागू होतील.

अरे वाह! …मग स्वस्त होणार Cylinder! होर्मुझमधील नाकाबंदी उठवली तर भारताचं टेन्शन संपणार?

Web Title: Lpg cylinder new rules from june 1 gas connection cancellation and kyc see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Business News
  • LPG
  • LPG Crisis
  • lpg cylinder
  • LPG Gas Crisis
  • LPG Shortage
  • LPG Supply
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान
1

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
2

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

Vibrant Goa Summit: उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना
3

Vibrant Goa Summit: उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
4

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.