Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Gas घेऊन येणारी जहाजं अडकली होर्मुझच्या सामुद्रधुनीत? आता भारतात गॅस पुरवठा खंडित होणार? काय आहे सत्य परिस्थिती?

इराणकडून करण्यात आलेल्या नाकेबंदीमुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठांमध्ये बरीच खळबळ उडाली आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी सरकारे आणि जहाजवाहतूक कंपन्यांना नवीन धोरणे आखावी लागली आहे. त्याचा परिणाम म्हणून दरांमध्येदेखील बरीच वाढ झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 07, 2026 | 03:35 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

LPG Gas Supply : अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर हल्ले करण्यास सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने या मार्गाची नाकेबंदी करण्याची घोषणा केली; हा मार्ग जगातील सुमारे २० टक्के तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. इराणकडून करण्यात आलेल्या नाकेबंदीमुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठांमध्ये बरीच खळबळ उडाली आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी सरकारे आणि जहाजवाहतूक कंपन्यांना नवीन धोरणे आखावी लागली आहे. त्याचा परिणाम म्हणून दरांमध्येदेखील बरीच वाढ झाली आहे.

661 कोटींच्या हेराफेरीप्रकरणी मोठी धरपकड! चंदीगड ते दिल्ली- NCR पर्यंत CBI ची छापेमारी, प्रकरण काय?

या सगळ्या परिस्थितीचा संपूर्ण जगासोबतच भारतावरही मोठा परिणाम होत आहे. कारण भारत आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी या जलमार्गावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे; भारताचे सुमारे ३० टक्के कच्चे तेल आणि जवळपास ७० टक्के द्रवीभूत पेट्रोलियम वायू म्हणजेच LPG याच मार्गावरून वाहून नेला जातो. या सगळ्यामध्ये सध्याची परिस्थिती बरीच बिघडलेली असतना देखील भारताने या क्षेत्रातून जहाजांची सततची ये-जा सुरू ठेवण्यात यश मिळवले आहे.

भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली ?

फेब्रुवारीच्या उत्तरार्धात होर्मुझ भागात तणाव वाढला आणि निर्बंध लागू करण्यात आले होते. तेव्हा भारतीय ध्वज असलेली ३६ ते ३८ व्यापारी जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या परिसरात अडकली होती. या जहाजांवर १,१०० हून अधिक भारतीय खलाशी होते. यातील अनेक जहाजे भारताच्या ऊर्जा गरजा आणि व्यापारी पुरवठा साखळ्यांशी संबंधित अत्यावश्यक मालाने भरलेली होती, तर काही जहाजे औद्योगिक उत्पादन आणि देशांतर्गत वापरासाठी आवश्यक असलेल्या मालाची वाहतूक करणारी होती.

सरकारी आकडेवारी काय सांगते?

सरकारी आकडेवारीनुसार, मार्चच्या मध्यापासून भारतीय ध्वज असलेली सुमारे २३ ते २५ जहाजे होर्मुझ भागातून यशस्वीपणे बाहेर पडली आहेत. मे महिन्याच्या अखेरीस मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय ध्वज असलेली केवळ १३ जहाजे आखाती भागात किंवा सामुद्रधुनीच्या परिसरात शिल्लक होती. त्यांची सुरक्षित सुटका व्हावी हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार अत्यंत धडाडीने अत्यंत महत्त्वाची एक आपत्कालीन मोहीम राबवत आहे.

भारतात गॅसचा तुटवडा आहे का?

सरकार आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनांनुसार, देशात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत आणि सुरक्षित आहे. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’वरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत तेल शुद्धीकरण प्रकल्प त्यांच्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. यामुळे LPGचं दैनंदिन उत्पादन ५०,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढलं आहे. त्याद्वारे देशाच्या एकूण मागणीपैकी ६० टक्क्यांहून अधिक मागणी पूर्ण होत आहे.
देशाला आश्वस्त करताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलंय की, “देशात घरगुती ग्राहकांसाठी एलपीजी सिलिंडरचा कोणताही तुटवडा नाही आणि गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. नागरिकांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही.” त्यामुळे भारतात सध्या तरी साठा मुबलक प्रमाणात असल्याचं स्पष्ट होतं.

मोठा झटका, घरगुती Cylinder च्या किमती पुन्हा कडाडल्या; सरकारची नेमकी भूमिका काय?

Web Title: Lpg gas ships stuck in strait of hormuz impact on india supply see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Commercial LPG
  • LPG
  • LPG Crisis
  • lpg cylinder
  • lpg cylinder shortage
  • LPG Supply
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

Gas ग्राहकांसाठी मोठी बातमी! LPG Cylinder Booking बाबत सरकारने घेतला निर्णय, ‘या’ कडक नियमांत केला बदल
1

Gas ग्राहकांसाठी मोठी बातमी! LPG Cylinder Booking बाबत सरकारने घेतला निर्णय, ‘या’ कडक नियमांत केला बदल

Strait of Hormuz: इराणचा US ला मोठा दणका! होर्मुझ सामुद्रधुनीत नवीन ‘प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित; जागतिक तेलाच्या पुरवठ्यावर संकट
2

Strait of Hormuz: इराणचा US ला मोठा दणका! होर्मुझ सामुद्रधुनीत नवीन ‘प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित; जागतिक तेलाच्या पुरवठ्यावर संकट

US-Iran war: युद्धाचा भडका! अमेरिकन नौदलाने Red Sea मधून 86 जहाजे वळवली; हुथींचे क्षेपणास्त्र हल्ले, जागतिक तेलाचे संकट गहिरे
3

US-Iran war: युद्धाचा भडका! अमेरिकन नौदलाने Red Sea मधून 86 जहाजे वळवली; हुथींचे क्षेपणास्त्र हल्ले, जागतिक तेलाचे संकट गहिरे

Iran News : आखातात इंधन तस्करीचा पर्दाफाश; ३.८२ लाख लिटर इंधन जप्त, ११ जण अटकेत
4

Iran News : आखातात इंधन तस्करीचा पर्दाफाश; ३.८२ लाख लिटर इंधन जप्त, ११ जण अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.