(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
CBI Raid in Bank Fraud Case: हरियाणा सरकार आणि चंदीगड प्रशासनाच्या विविध विभागांमधील सरकारी निधीचा गैरवापर केल्याच्या कथित ६६१ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी, सीबीआयने आज चंदीगड, पंचकुला आणि दिल्ली-एनसीआर (NCR) परिसरातील सहा ठिकाणी छापे टाकले. आजच्या दिवसातील ही सगळ्यात मोठी कारवाई मानली जात आहे. नेमकं प्रकरण काय आहे? समजून घेऊयात.
IDFC First Bank आणि AU Finance Bank येथील निधीच्या कथित गैरवापराबाबत सुरू असलेल्या तपासाचा एक भाग म्हणून, सीबीआयच्या पथकाने सगळ्यात अगोदर या निधीच्या वाटपात सहभागी असलेल्या हरियाणा सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले.
या तपास एजन्सीच्या निशाण्यावर नोएडास्थित ‘विपम कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड’ आणि तिच्या संचालक देखील आहे. ज्यांच्या मदतीने फंट डायवर्ड केल्याचा संशय आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, या फसवणुकीचा फटका हरियाणा सरकारच्या आठ विभागांना आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशातील दोन विभागांना बसला आहे.
आज टाकलेल्या छाप्यांमध्ये, सीबीआयने अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक कागदपत्रे, डिजिटल उपकरणे जसं की लॅपटॉप, फोन आणि ‘बेनामी’ मालमत्तेशी संबंधित नोंदी हस्तगत केल्या. एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “तपासादरम्यान गोळा केलेल्या पुराव्यांवरून असे दिसून येते की, सरकारी कर्मचाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांच्या संगनमताने बँक खाती उघडणे, निधीचे हस्तांतरण करणे आणि त्यानंतर तो पैसा अन्य ठिकाणी वळवणे या प्रक्रियेत मदत केली गेली आहे.”
तपासातून असे समोर आले आहे की, IDFC फर्स्ट बँक आणि AU स्मॉल फायनान्स बँकेतील भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी हरियाणा सरकारच्या आठ विभागांमधील आणि चंदीगड प्रशासनाच्या दोन विभागांमधील अधिकाऱ्यांसोबत मिळून सार्वजनिक वापर आणि विकासकामांसाठी असलेली निधीची रक्कम या बँकांमध्ये FD मध्ये जमा करण्यात आली.
त्यानंतर, आरोपींनी बनावट चेक आणि डॉक्यूमेंट्सचा वापर करून हा निधी ‘शेल कंपन्या’ म्हणजेच केवळ कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या कंपन्या आणि खाजगी खात्यांमध्ये वळवला. या प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे. CBI यापूर्वीच १५ मुख्य आरोपींविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले आहे; यामध्ये बँकेचे सहा कर्मचारी आणि तीन सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आजच्या रेडमध्ये मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे एक पूरक आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
तबाही… Share Market मध्ये तुफानाचे संकेत, अमेरिकन बाजारात मोठी घसरण; आता भारताचा नंबर?






