काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील पीडित मुलगी ही नववीत शिक्षण घेत आहे. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलाविले होते. भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन बाहेर गेली. मात्र शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला थांबवले. “मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाईन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो,” असे म्हणत तिचा हात पकडला, असा आरोप आहे.
Nanded Crime: पूर्व वैमानस्यातून रक्तरंजित शेवट! १६ वर्षीय मुलाची खंजीराने हत्या; नांदेडमध्ये खळबळ
गुन्हा दाखल
ही घटना घडताच घाबरलेल्या मुलीने हात झटकून वर्गात धाव घेतली. त्यांनंतर तिने घडलेली घटना मैत्रिणी व कुटुंबियांना सांगितली. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सातारा धक्कादायक! बारावीच्या विद्यार्थिनीचं गुंगीचं औषध देऊन अपहरण; शुद्धीवर आली तेव्हा पुणेत
सातारा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीची परीक्षा देणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन अपहरण केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगी एक्सट्रा क्लाससाठी जात होती तेव्हा हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वाराकडून तिने लिफ्ट घेतली. त्यांनतर ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यांनतर ती पुण्यात असल्याचे लक्षात आले. तिने स्थानिकाच्या मोबाईलवरून कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यांनतर ती सुखरूप घरी परतली.
गुन्हा दाखल
“लिफ्ट घेतल्यानंतर पुढे काय झाले, हे मला अजिबात आठवत नाही. जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा मी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात होते,” असे पीडित मुलीने सांगितले आहे. मुलीचे वडील बाजीराव वारागडे यांनी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयिताचा शोध सुरु केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
Ans: संबंधित शाळेतील शिक्षकावर आरोप आहे.
Ans: पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
Ans: तिने मैत्रिणी व कुटुंबीयांना माहिती देत पोलिसांत तक्रार केली.






