फोटो सौैजन्य - Social Media
तीन पिढ्यांपासून चालत आलेला हा वारसा आज मुकेश शर्मा मोठ्या अभिमानाने जपत आहे. आधी कोलकातामध्ये असणारा त्यांचा हा स्वादिष्ट व्यवसाय आता दिल्लीमध्येही हवा करत आहे. पण ही हवा करण्याचे श्रेय मुकेश शर्मा यांना जाते. व्यवसाय नव्या शहरात स्थलांतरित करूनही त्या व्यवसायाचे चाहते काही कमी झाले नाही, याउलट ते इतके वाढले की एकेकाळी ठेल्यावर दही भल्ले विकणारे मुकेश शर्मा आज BMW मध्ये फिरत आहेत.
मुकेश यांचा हा स्वादिष्ट प्रवास १९८९ रोजी सुरु झाला. आज त्यांच्या एका दही भल्ल्याची किंमत ५० रुपये आहे. पण त्याकाळी २ रुपयांनी हे विकले जायचे. यांचे ग्राहक म्हणतात की इतके वर्ष झाली पण त्यांच्या चवीमध्ये काही फरक आला नाही. त्यांच्या दही भल्ल्याची चव चाखण्यासाठी देशभरातून खवय्येमंडळी येत असतात. मुकेश यांनी त्यांच्या या चवीचा फॉर्मुला लोकांपर्यंत आणला आहे. मुळात, हे दही भल्ले १६ वेगवेगळ्या मसाल्यांनी तयार झाला आहे. भल्ला मुंग डाळपासून तयार झाला आहे. तसेच यावर दररोज ४० किलो ताजे काहींचा मारा दिला जातो, जेणेकरून दही भल्ले तोंडात टाकल्या-टाकल्या वितळून जातील.
मुकेश शर्मा यांची खजूरपासून तयार केलेली गोड चटणीही तितकीच लोकप्रिय आहे, ज्यावर ते सहा महिन्यांची हमी देतात. चटणीसह जवळपास सर्व साहित्य त्यांच्या घरातच तयार केलं जातं, फक्त मीठ सोडून. त्यांच्या या आत्मनिर्भरतेमुळे आणि क्वालिटी कंट्रोलमुळे ‘शर्मा जी’ चाटचा स्वाद नेहमी एकसारखा राहतो.
मुकेश शर्मा दररोज पहाटे २:३० वाजता उठतात, जेणेकरून भल्ला तयार करण्याची सर्व तयारी वेळेवर पूर्ण होऊ शकेल. त्यांची दुकान सामान्यतः सकाळी ९ ते १० दरम्यान उघडते आणि संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चालते. मुकेश शर्मा यांचा हा व्यवसाय तीन पिढ्यांपासून सुरू आहे. पूर्वी त्यांचा परिवार कोलकात्यामध्ये दही भल्ल्याचे दुकान चालवत होता. नंतर ते दिल्लीला स्थलांतरित झाले आणि त्यांनी या व्यवसायाला नवे यश आणि उंची मिळवून दिली.