टाटांच्या 'या' कंपनीमुळे गुंतवणूकदार मालामाल; 1 लाखाचे झाले तब्बल 45 लाख रुपये!
जगभरातील शेअर बाजारात आठवडाभराच्या घसरणीनंतर गेले दोन ते तीन दिवस पुन्हा चमक पाहायला मिळत आहे. ज्यामुळे शेअर बाजार आणि एकूणच गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. असे असतानाच आज (ता.९) एका स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल 7 टक्क्यांपर्यंत परतावा मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे हा स्टॉक अल्पावधीतच मल्टीब्लॉगर स्टॉक ठरला आहे.
आज शेअरमध्ये ७ टक्क्यांनी उसळी
गेले तीन दिवस भारतीय शेअर बाजारात चांगली उसळी पाहायला मिळाली आहे. मागील तीन दिवसांपासून बाजार वाढीसह बंद झाला आहे. अशातच आज टाटा या देशातील आघाडीच्या उद्योग समूहाच्या टाटा टेलिसर्व्हिसेज (महाराष्ट्र) लिमिटेडच्या (TTML) या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 7 टक्क्यांपर्यंत परतावा मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर या शेअरने गुंतवणूकदारांना अनेक पटीत परतावा मिळवून दिला आहे.
हेही वाचा : शेअर बाजारातील चमक परतली; सेन्सेक्स 820 तर निफ्टी 250 अंकांच्या वाढीसह बंद!
शेअरची किंमत 98.20 रुपयांच्या उच्चांकावर
आज शेअर बाजारात टाटा टेलिसर्व्हिसेज (महाराष्ट्र) लिमिटेडच्या (TTML) या कंपनीच्या शेअरची किंमत 98.20 रुपयांच्या उच्चांकावर पोहचली आहे. टाटा टेलिसर्व्हिसेज (महाराष्ट्र) लिमिटेडच्या या शेअरने एका महिन्यात गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांपर्यंतचा जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 111.48 रुपये प्रति शेअर होता. तर 52 आठवड्यातील निच्चांक 65.29 रुपये आहे.
१ लाखाचे झाले ४५ लाख रुपये
दरम्यान, टाटा टेलिसर्व्हिसेज (महाराष्ट्र) लिमिटेडच्या शेअरने गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षांत जवळपास 3189.47 टक्क्यांचा परतावा मिळवून दिला आहे. पाच वर्षांपूर्वी या शेअरची किंमत अवघी 2 रुपये प्रति शेअर होती. आता हा शेअर 98.20 रुपयांवर पोहचला आहे. अर्थात जर पाच वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने टाटा टेलिसर्व्हिसेज (महाराष्ट्र) लिमिटेडचे 1 लाख रुपयांचे शेअर खरेदी केले असते. तर आज त्याची किंमत 45 लाख रूपयांहून अधिक असती. पाच वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. सध्याच्या घडीला टाटा टेलिसर्व्हिसेज (महाराष्ट्र) लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप 18,947.16 कोटी रुपये आहे.