गणेशोत्सवाची सांगता दिं 17 सप्टेंबर अनंत चतुर्दशीला झाली. मात्र प्रत्येक जण गणेशोत्सवाच्या त्या वातावरणात गुंग आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाची बातच काही और असते. आगमन सोहळा, विर्सजन मिरवणूक, सजावट हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे वैशिष्टय. मुबंईतील प्रतिष्ठित गणेशोत्सव मंडळ लालबागचा राजा आणि चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यांच्यासोबत साजरीकरणासाठी नेस्टेरा या प्रिमिअम होम फर्निशिंग्ज ब्रँडने सहयोग केला होता. या सहयोगामधून कला, भक्ती व सांस्कृतिक अभिमानाचे संयोजन असलेल्या लक्झरी डिझाइनच्या दृष्टिकोनातून अद्भुतरित्या भारतीय परंपरांना साजरे केले गेले. नेस्टेरा हा के. के. बिर्ला ग्रुपचा भाग सतलेज टेक्सटाइल्सअॅण्ड इंडस्ट्रीज लि.च्या प्रिमिअम होम फर्निशिंग्ज ब्रँड आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारांवर आधारित १०५ वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आलेल्या आगमानाधीश चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने मुंबईतील सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा जपली आहे. लालबागचा राजा मंडळाची १९३४ मध्ये स्थापना करण्यात आली हे मुंबईकरांचे श्रध्दास्थान. भव्य दिव्य आकर्षक सजावट आणि गणपती बाप्पाच्या मोठ्या मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या या दोन्ही मंडळांना गणेशोत्सवादरम्यान हजारो भक्तांनी भेट दिली. निसर्गाचे सौंदर्य व वैविध्यपूर्ण संस्कृतींमधून प्रेरित नेस्टेराचे डिझाइन तत्त्व या मंडळांच्या आध्यात्मिक आभाशी सुसंगत होते. नेस्टेराचा सहयोग प्रायोजकत्वापलीकडे गेला. यामध्ये डिझाइनच्या क्षमतेच्या माध्यमातून सामुदायिक भावना निर्माण करण्याला महत्त्व देण्यात आले. प्रीमियम साहित्यासह डिझाइन करण्यात आलेले आकर्षक फॅब्रिक्स आणि बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष देत लक्षवेधक इन्स्टॉलेशन्स तयार करण्यात आले होते. प्रीमियम आकर्षकता आणि सांस्कृतिक अभिमानाच्या या अद्वितीय एकत्रिकरणाने भक्ती व कलात्मक अभिव्यक्तीची विशिष्ट गाथा सांगितली.
३१ ऑगस्ट रोजी चिंचपोकळीचा चिंतामणीच्या आगमन मिरवणूकीदरम्यान गणपती बाप्पाच्या मूर्तीचे अनावरण करण्यासाठी नेस्टेराच्या आकर्षक फॅब्रिकचा वापर करण्यात आला, ज्यामधून लाखो गणेशभक्तांना संस्मरणीय अनुभव मिळाला. नेस्टेराचे सिग्नेचर तत्त्व गणेशोत्सवासाठी ७ सप्टेंबर रोजी अनावरण करण्यात आले, ज्यामधून त्यांचा प्रीमियम दर्जा व डिझाइन्ससह आकर्षक सजावटी, तसेच क्यू स्टँडीज, बॅनर्स व कर्टन्सना दाखवण्यात आले.
”आम्हाला यंदा गणेशोत्सवासाठी मुंबईतील सर्वात लोकप्रिय मंडळ – लालबागचा राजा आणि चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यांच्यासोबत सहयोग करण्याचा अभिमान वाटला. भारतीय परंपरा साजरे करण्याच्या आमच्या वारसाशी संलग्न राहत या सहयोगाने आम्हाला डिझाइनची परिवर्तनात्मक क्षमता दाखवण्याची संधी दिली,” असे नेस्टेरा येथील होम टेक्स्टाइल्सच्या उपाध्यक्ष स्मिता जोशी म्हणाल्या. “या सहयोगाने सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न सेटिंगसह आमची नाविन्यपूर्ण डिझाइन आकर्षकता दाखवण्यासाठी अद्वितीय प्लॅटफॉर्म दिला. पारंपारिक घटकांना समकालीन डिझाइनसह एकत्र करत आम्ही अत्यंत संस्मरणीय अनुभव निर्माण केला आहे, जो स्थानिक समुदायाशी संलग्न झाला आणि या उत्साहपूर्ण परंपरेच्या उत्साहाला साजरे केले.”