Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Price Hike: प्रत्येक सिलेंडरवर 380 रुपयांचा तोटा, तरीही सरकारने वाढवल्या नाहीत किमती; पण का? ‘हे’ आहे कारण…

७ मार्चला घरगुती सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या पण घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या सिलिंडर्सच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे सरकारला तोटा सहन करावा लागत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 01, 2026 | 12:43 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • १९-किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडर्सच्या किमती वाढवल्या
  • घरगुती वापरासाठीच्या सिलिंडर्सच्या किमतीत बदल नाही
  • यासाठी घरगुती गॅसच्या किमती वाढल्या नाहीत
LPG Price Hike: जागतिक स्तरावर दिवसेंदिवस युद्धजन्य परिस्थिती फोफावतच आहे. परिणामी जागतिक स्तरावर महागाईचा मोठा भडका उडाला आहे. त्याचा परिणाम जगसोबतच भारतालाही भोगावा लागतो आहे. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये तीव्र वाढ झाली. त्यामुळे जगभरात तेल आणि वायूच्या किमतींमध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे. भारतात Oil Marketing कंपनींनी आजपासून १९-किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडर्सच्या किमती वाढवल्या आहेत. दिल्लीत सिलेंडरची किंमत तब्बल १९५.५० रुपयांनी वाढवण्यात आली आहे. ७ मार्चला घरगुती सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या पण घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या सिलिंडर्सच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सरकारने तर हे स्पष्ट केलं की, तेल कंपन्यांना प्रत्येक सिलिंडरवर ३८० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे; पण असे असूनही, भारतातील LPG सिलिंडर्सच्या किंमती नेपाळ, पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशांच्या किंमतींच्या तुलनेत कमीच राहिली आहे.

डोनाल्ड ट्रम्पवरच भारी पडला Tariff, द्यावा लागणार पै पै चा हिशोब; Online Portal द्वारे US सरकार देणार 166 अब्ज डॉलर्स परत

व्यावसायिक LPG सिलिंडर्सच्या किमतींवर सरकारचं नियंत्रण नाही

‘X’ म्हणजेचं पूर्वीच्या ट्विटरवर पोस्ट करत पेट्रोलियम मंत्रालयानं स्पष्ट केलंय की,व्यावसायिक LPG सिलिंडर्सच्या किमतींवर सरकारचं कोणतेही नियंत्रण नसते किंवा ते नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि त्यांचे दर बाजारात होत असलेल्या मागणी-पुरवठ्याच्या गतीवरुन निश्चित केले जातात. या सिलिंडर्सचा वापर प्रामुख्याने उद्योग आणि हॉटेल्समध्ये केला जातो आणि त्यांच्या किमतींचा आढावा दर महिन्याच्या पहिल्या दिवशी घेतला जातो. देशातील एकूण LPG वापरापैकी व्यावसायिक LPG चा वाटा केवळ १० टक्के इतकाच आहे.

प्रत्येक सिलिंडरवर किती तोटा होत आहे?

या निवेदनात पेट्रोलियम मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, आज जाहीर झालेली व्यावसायिक सिलिंडर्सच्या किमतींमधील वाढ ही आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या प्रचंड वाढीचा थेट परिणाम आहे. ‘सौदी कॉन्ट्रॅक्ट प्राईस’मध्ये (Saudi Contract Price) मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये ४४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मार्च महिन्यात ही किंमत ५४२ डॉलर्स प्रति टन इतकी होती, जी नंतर वाढून एप्रिलमध्ये ७८० डॉलर्स प्रति टन झाली. शिवाय, इराणशी संबंधित संघर्षामुळे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) मार्गे होणारी जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी, जागतिक एलपीजी पुरवठ्यापैकी २० ते ३० टक्के पुरवठा ठप्प झाला आहे. त्याचा परिणाम या किंमतींवर झाला आहे.

यासाठी घरगुती गॅसच्या किमती वाढल्या नाहीत

सरकारने ठामपणे सांगितले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेशी सुसंगत राहून, घरगुती ग्राहकांसाठी गॅसच्या किमती वाढवण्यात आलेल्या नाहीत. १४.२-किलोच्या सिलिंडर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही; दिल्लीमध्ये सध्या या सिलिंडर्सची किंमत ९१३ रुपये इतकी आहे. त्याचप्रमाणे, ‘उज्ज्वला योजने’च्या लाभार्थ्यांसाठी ही किंमत ६१३ रुपयांवरच कायम ठेवण्यात आली आहे. या दरांवर सिलिंडर्सची विक्री केल्यामुळे, तेल विपणन कंपन्यांना विक्री होणाऱ्या प्रत्येक सिलिंडरवर ३८० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

पाकिस्तानपेक्षाही स्वस्त सिलिंडर्स

मे महिन्याच्या अखेरीस, या कंपन्यांचा एकूण तोटा अंदाजे ₹४०,४८४ कोटींपर्यंत पोहोचू शकतो. गेल्या वर्षीही, ₹६०,००० कोटींचा तोटा झाला होता. या रकमेपैकी, ₹३०,००० कोटींचा बोजा तेल विपणन कंपन्यांनी उचलला, तर उर्वरित ₹३०,००० कोटींचा भार सरकारवर पडला आहे. अनेक शेजारील देशांच्या तुलनेत, भारतात LPG सिलिंडर्स स्वस्त आहेत. पाकिस्तानमध्ये याची किंमत ₹१,०४६, श्रीलंकेत ₹१,२४२ आणि नेपाळमध्ये ₹१,२०८ इतकी आहे. पण भारतामध्ये ही किमत हजारच्या आतच ठेवण्यात आली आहे.

Stock Market Today: कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? व्यवहार करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Web Title: Oil marketing companies are incurring under recovery of rs 380 per cylinder claims govt marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • Business News
  • india- Pakistan
  • LPG
  • LPG Crisis
  • lpg cylinder
  • lpg cylinder shortage
  • LPG price
  • LPG Shortage
  • Marathi News

संबंधित बातम्या

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
1

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?
2

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
3

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Greece मध्येही सुरु झाली UPI सेवा, आता भारतीय 10 देशांमध्ये करु शकतात डिजिटल पेमेंट
4

Greece मध्येही सुरु झाली UPI सेवा, आता भारतीय 10 देशांमध्ये करु शकतात डिजिटल पेमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.