हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात. मात्र, गुंतवणुकीमध्ये असलेला धोका लक्षात अनेक जण सावध सुरुवात करतात. विशेष म्हणजे ते चांगला परतावा देखील मिळवतात. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी ही गेल्या काही दिवसांपासून आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देत आहे. कंपनीने नुकतीच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. या बोनस शेअरची रेकॉर्ड डेट ही 21 जून 2024 असणार आहे. दरम्यान, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये १० वर्षांपूर्वी ज्यांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांना आज 10 वर्षानंतर 29 लाखांहुन अधिक रक्कमेचा परतावा मिळणार आहे. परिणामी, आता आगामी काळात देखील कंपनीची कामगिरी ही चांगली राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एचपीसीएलचे शेअर्स ५३६ रुपयांवर
11 जुलै 2014 रोजी एचपीसीएलचे शेअर्स 83.68 रुपयांच्या पातळीवर होते. त्यावेळी, जर तुम्ही एचपीसीएलच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असतीस तर तुम्हाला 1194 शेअर्स मिळाले असते. गेल्या 10 वर्षांत कंपनीने अनेक वेळा शेअर्स बोनस दिले आहेत. हे बोनस शेअर्स जोडल्यास, 100,000 च्या गुंतवणुकीसह खरेदी केलेल्या शेअर्सची एकूण संख्या 5372 पर्यंत वाढली असती. दरम्यान, सध्याच्या घडीला एचपीसीएलचे शेअर्स ५३६ रुपयांच्या पातळीवर आहेत. अशा स्थितीत या शेअर्सचे मूल्य जवळपास २९ लाख रुपये झाले असते.
(फोटो सौजन्य : istock)
वर्षभरात मिळाला 96 परतावा
हिंदुस्तान पेट्रोलियमच्या शेअर्समध्ये मागील वर्षभरात 96 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी सांगितले की, एचपीसीएलच्या शेअर्समध्ये लवकरच वाढ होऊन, ते 565 रुपयांच्या पातळीपर्यंत वाढू शकतात. १५ जून रोजी हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या शेअरचे मूल्य हे 273. 85 रुपये होते.
21 जूनला असेल बोनस शेअरची रेकॉर्ड डेट
हिंदुस्तान पेट्रोलियमच्या शेअरधारकांना प्रत्येक दोन शेअरच्या बदल्यात एक बोनस मोफत मिळणार आहे. त्यामुळे आता महारत्न दर्जा प्राप्त असलेली हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देत मालामाल करणार आहे. 14 जून रोजी अर्थात शुक्रवारी हिंदुस्तान पेट्रोलियमचे शेअर 536.25 रुपयांवर बंद झाले आहे.