Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Online Liquor : मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! आता घरबसल्या ऑर्डर करु शकता दारु! ‘या’ राज्य सरकारने सुरू केली भन्नाट सुविधा

Online Liquor : मद्यप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता दुकानात किंवा वाईन्स शॉपबाहेर लांबच लांब रांगेत उभे न राहता घरबसल्या ऑनलाईन दारू बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. कोणत्या राज्य सरकारने ही सुविधा सुरु केली आहे? कशी असणार प्रोसेस?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 07, 2026 | 03:15 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी!
  • घरबसल्या ऑर्डर करु शकता दारु!
  • ‘या’ राज्य सरकारची भन्नाट सुविधा
Online Liquor : मद्यप्रेमींसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. आता दुकानात किंवा वाईन्स शॉपबाहेर लांबच लांब रांगेक उभ राहण्याची गरज लागणार नाही. कारण आता घरबसल्या ऑनलाईन दारू ( Online Liquor ) बुक करता येणार आहे. नुकतीच ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांना बनावट दारूपासून मुक्ती, पारदर्शक किमती आणि वेळेची बचत यांसारखे अनेक मोठे फायदे मिळणार आहेत. कोणत्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. आणि नेमकी कशी असणार प्रक्रिया?

GST Reform Demands: GST रिटर्न, ITC, नोटिसांचा ताप संपणार? लहान व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी FISME कडून मास्टरप्लॅन सादर

आता तुम्हाला लांबच लांब रांगेत उभं राहण्याची गरज लागणार नाही जर तुम्ही तामिळनाडू राज्यात राहत असाल. नुकताच सरकारने दारूची विक्री पूर्वीपेक्षा अधिक सोपी आणि जलद करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ६ ऑगस्ट रोजी, तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच TASMAC ने एक नवीन मोबाईल ॲप सुरू केले आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून दारूचा ब्रँड आणि किंमत पाहू शकता तसेच ऑनलाइन ऑर्डर देऊ शकता.

राज्यात किती दुकानांमध्ये ही सुविधा होणार लागू?

TASMAC ची डिजिटल मद्य प्रणाली राज्यातील अंदाजे ४,०३८ किरकोळ दुकानांमध्ये लागू केली जाईल. या ॲपचा वापर करून तुम्ही जवळपासची दुकाने सहजपणे शोधू शकता. याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक दुकानात कोणते ब्रँड उपलब्ध आहेत आणि त्यांच्या किमती काय आहेत, हे तुम्हाला या ॲपद्वारे शोधणं सोपं होणार आहे.

हे स्पेशल ॲप का सुरु केलं जातंय?

अलीकडेच, काही TASMAC कर्मचाऱ्यांवर ग्राहकांकडून जास्त पैसे आकारल्याचा आरोप झाला होता. मात्र, अशी प्रकरणे उघडकीस आल्यानंतर महामंडळाने त्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली. त्यामुळे, जास्त पैसे आकारण्याच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी आता या नवीन ॲपचा वापर केला जात आहे.

नवीन प्रणाली कशी काम करते?

तुम्ही आता तुमच्या मोबाईल ॲपद्वारे दारूचा ब्रँड आणि किंमत सहजपणे पाहू शकाल. तुम्ही तुमचे आवडते उत्पादन ऑनलाइन ऑर्डर देखील करू शकता. ऑनलाइन पेमेंट पूर्ण झाल्यावर, तुम्हाला एक QR कोड दिला जाईल. संबंधित TASMAC रिटेल दुकानात हा QR कोड दाखवून तुम्ही तुमची दारू घेऊ शकता. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, दारू खरेदी करण्यासाठी तुम्हाला आता दुकानांमध्ये लांब रांगेत थांबण्याची गरज नाही.

ग्राहकांना काय फायदा होईल?

  • ब्रँडनुसार, दारूची खरी किंमत समोरच दाखवली जाईल.
  • MRP पेक्षा जास्त किंमत आकारण्याची शक्यता कमी होईल.
  • डिजिटल पेमेंटमुळे व्यवहारांना गती मिळेल.
  • यामुळे दुकानांमधील लांब रांगा कमी होतील.
  • ही सुविधा इतर राज्यांमध्येही उपलब्ध आहे.
  • तामिळनाडूच्या आधी, काही राज्यांनी ऑनलाइन दारू बुकिंगची सुविधा आधीच सुरू केली आहे.
  • पश्चिम बंगालमध्ये, ई-रिटेल पोर्टलद्वारे दारू ऑनलाइन ऑर्डर केली जाऊ शकते.
  • ओडिशामध्ये परवानाधारक दुकाने आणि अधिकृत प्लॅटफॉर्मद्वारे दारूची होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध आहे.
Free UPI Transaction End: आता UPI द्वारे पैसे पाठवणं महागणार? सरकार आणि बँकांचा नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम होणार?

Web Title: Online liquor booking service start check benefits for customers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Business News
  • liquor
  • Liquor Case
  • Liquor Sales
  • liquor shops
  • Marathi News
  • online
  • online booking
  • online payment
  • Online Sale

संबंधित बातम्या

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
1

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
2

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले
3

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती
4

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.