Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डॉलरचा दबदबा संपणार? RBI सह 72 देशांच्या केंद्रीय बँकांचा मोठा गेम प्लॅन; सोन्याची तुफान खरेदी सुरु… नेमकं काय घडणार?

RBI आणि जगातील इतर ७२ मध्यवर्ती बँकांनी मोठा प्लॅन आखला आहे. या बँकांनी सोन्याच्या साठ्यात केली जाणारी विक्रमी खरेदी आणि त्यामुळे जागतिक अर्थकारणात अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला धक्का बसणार असल्याचं वर्तवलं जातं आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 17, 2026 | 12:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

फेब्रुवारीमध्ये सुरू झालेले इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता संपलं आहे. पण जितकं सहज बोलतो तितकं सहज हे युद्ध संपलेलं नाही. त्या देशांसह इतर देशांवरही किंबहून जागतिक स्तरावरही अवघ्या काही महिन्यांत गंभीर परिणाम झाले आहे. परिणामी, भारताला तेल आणि वायूच्या तुटवड्याचा सामना करावा लागला, तसेच रुपयाही कमकुवत झाला. रुपया कमकुवत होत असताना डॉलर मजबूत झाला, ज्यामुळे जनतेसमोरही मोठी समस्या निर्माण झाली त्याचं सगळ्यात मोठं स्वरुप ते म्हणजे महागाई. भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी सरकार आता तगडा प्लॅन बनवत आहे.

हुशश! 2 महिन्यांची कोंडी संपली… Iran चं तेल आता बाजारात येण्यास सुरुवात, जागतिक अर्थकारणावर काय परिणाम होणार?

देशातील सोन्याचा साठा वाढणार

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने WGC मंगळवारी एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, जगभरातील मध्यवर्ती बँका पुढील पाच वर्षांत आपला सोन्याचा साठा वाढवण्याची शक्यता आहे. सोन्याचा साठा जसजसा वाढत जाईल, तसतसा डॉलरच्या साठ्याचा वाटा कमी होईल. WGC च्या ‘सेंट्रल बँक गोल्ड रिझर्व्ह सर्व्हे’नुसार ८४% मध्यवर्ती बँकांचा असा विश्वास आहे. केवळ भारताची RBI नाही, तर इतर ७२ देशांच्या मध्यवर्ती बँकासुद्धा असे करण्याचा मास्टर प्लॅन बनवत आहेत.

या योजनेमुळे डॉलर कमकुवत होईल?

WGC च्या अहवालानुसार, सोन्याचा साठा वाढल्यास डॉलरच्या साठ्यात किंचित घट होईल. या सर्वेक्षणादरम्यान, जेव्हा अनेक मध्यवर्ती बँकांची याविषयी मुलाखत घेण्यात आली, तेव्हा त्यापैकी ७४% बँकांनी सांगितले की पुढील पाच वर्षांत डॉलरचा साठा कमी होईल. १५% बँकांनी सांगितले की कोणताही बदल होणार नाही. तर, ११% बँकांनी सांगितले की साठ्यामध्ये डॉलरचा वाटा वाढेल.

RBI कडे किती सोनं?

नवीन आकडेवारीनुसार, RBI कडे सध्या ८८०.५२ मेट्रिक टन सोने आहे. जून २०२६ मध्ये, RBI ने जाहीरपणे सांगितले होते की त्यांनी सोन्याचा साठा कमी केलेला नाही आणि त्यांचा प्रत्यक्ष सोन्याचा साठा ८८०.५२ टन इतकाच आहे. भारताकडे जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या साठ्यांपैकी एक आहे. भारत काही काळापासून आपल्या परकीय चलन साठ्यातही सोने ठेवत आहे. जर WGC चा अहवाल खरा ठरला, तर भविष्यात सोन्याचा साठा आणखी वाढेल.

RBI चा बँकांना दणका… आता तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही! बँकांच्या मनमानी कारभारावर लागणार रोख, सर्वसामान्यांना दिलासा

Web Title: Rbi and 72 central banks increasing gold reserves end of us dollar dominance report marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • bank RBI
  • Business News
  • Gold
  • Gold mine
  • Marathi News
  • RBI
  • RBI Action
  • RBI news

संबंधित बातम्या

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…
1

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…

Maharashtra Today’s Live News in Marathi:  मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
3

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
4

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.