Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI च्या नावाने कोट्यवधींच्या लॉटरीचे मेसेज? केंद्र सरकारच्या PIB कडून बनावट घोटाळ्याचा Alert!

तुम्ही लॉटरीची जिंकली आहे किंवा परदेशी निधी वारसा हक्काने मिळाला आहे किंवा आरबीआय-समर्थित “Donation Program 2026 ” साठी पात्र ठरला आहात तर RBI च्या नावावर विश्वास ठेवून या गोष्टीला बळी पडू नकात. ही धोक्याची घंटा ठरु शकते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 27, 2026 | 03:09 PM
(फोटो- सोशल मिडिया)

(फोटो- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

RBI Scam Warns : जर तुम्हाला अलीकडेच असा ईमेल आला असेल की तुम्ही लॉटरीची जिंकली आहे किंवा परदेशी निधी वारसा हक्काने मिळाला आहे किंवा आरबीआय-समर्थित “Donation Program 2026 ” साठी पात्र ठरला आहात तर RBI च्या नावावर विश्वास ठेवून या गोष्टीला बळी पडू नकात. ही धोक्याची घंटा ठरु शकते. अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा कोणतेही पैसे पाठवू नका. कारण तुम्ही सर्वात मोठ्या फ्रॉडला बळी ठरु शकता. नुकतंच सरकारने एक नवीन घोटाळा सूचना जारी केली आहे. ज्यात अशा ईमेलबाबत मोठा इशारा देण्यात आला आहे. असे मेल बनावट असण्याची शक्यता आहे ते भोळ्या वापरकर्त्यांकडून पैसे आणि वैयक्तिक माहिती चोरण्याच्या उद्देशाने तयार केलेले असतात.

AI वर आधारित बँकिंगबाबत SBI चं मोठं विधान, म्हणाले, “मनुष्यबळ, कौशल्ये आणि नेतृत्व…”

सरकारची अधिकृत fact-checking unit, पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे की, फसवणूक करणारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आल्याचा खोटा दावा करणारे ईमेल पाठवतात. या फसवणुकीच्या मेलमध्ये लोकांना Donation Program 2026 / ‘लॉटरी जिंकल्याबद्दल compensation payment’ योजना / वारसा निधी इत्यादी अंतर्गत तथाकथित ‘क्रेडिटिंग फी’ भरण्यास सांगतात.

क्रेडिटिंग फी म्हणजे काय?

पेमेंटची विनंती अधिकृत वाटावी यासाठी घोटाळेबाज वापरत असलेली ही एक संज्ञा आहे. सामान्यतः, याचा अर्थ असा होतो की, एखाद्या व्यक्तीला त्यांच्या खात्यात “मंजूर”, “पुरस्कृत”, “दान”, “वितरित” किंवा “जमा” झालेले पैसे मिळण्यापूर्वी एक शुल्क भरावे लागते. पीआयबीने सांगितले की, या बनावट संदेशात असा दावा केला जातो की, प्राप्तकर्ते देणगी कार्यक्रम, लॉटरी जिंकल्याबद्दल मिळणारी भरपाई, वारसा निधी किंवा तत्सम आर्थिक योजनांद्वारे निधी मिळवण्यास पात्र असल्याचा मेल करत त्यांना हा निधी मिळवण्यासाठी वापरकर्त्यांना पैसे भरण्यास सांगितले जातात.

सरकारच्या मते, हे ईमेल एका फिशिंग घोटाळ्याचा भाग आहेत, ज्याचा उद्देश लोकांना माहिती शेअर करण्यास फसवणे हा आहे: बँकेचा तपशील, पासवर्ड, आधार माहिती, पॅन तपशील, ओटीपी किंवा थेट पेमेंट यांसारखी माहिती चोरण्याचा डाव असू शकतो.

PIB फॅक्ट चेकने स्पष्ट केले की:

आरबीआयने असा कोणताही ईमेल जारी केलेला नाही.
कोणताही देणगी कार्यक्रम चालवत नाही.
आणि लॉटरीची भरपाई किंवा वारसा योजना देत नाही.

हा इशारा विशेषतः महत्त्वाचा आहे कारण अशा फसवणुकींमध्ये अनेकदा ज्येष्ठ नागरिक, प्रथमच इंटरनेट वापरणारे, नोकरी शोधणारे आणि डिजिटल बँकिंग फसवणुकीबद्दल माहिती नसलेल्या लोकांना टार्गेट केले जाते. सामान्यतः, पीडितांना असे ईमेल येतात ज्यात दावा केला जातो की ते मोठ्या रकमेच्या भरपाईसाठी पात्र आहेत, परंतु त्यासाठी त्यांना प्रथम रक्कम भरावी लागेल: यात प्रक्रिया शुल्क, हस्तांतरण शुल्क, आरबीआय मंजुरी शुल्क किंवा खाते सक्रियकरण रक्कम यांसारख्या रक्कमांचा समावेश असतो. एकदा पैसे भरले की, घोटाळेबाज एकतर गायब होतात किंवा नवीन कारणे देऊन अतिरिक्त पैशांची मागणी करत राहतात.

बनावट ईमेलमध्ये खालील गोष्टींचा वापर

खरे वाटावे यासाठी आरबीआयचे लोगो, अधिकृत दिसणाऱ्या सह्या, बनावट सरकारी शिक्के किंवा खोटी पेमेंट कागदपत्रे वापरतात. कधी आरबीआय अधिकाऱ्यांची बनावट नावे, बनावट व्यवहार क्रमांक, किंवा सरकारी ब्रँडिंगची नक्कल केली करुन विश्वासार्हता निर्माण केली जाते.

सरकारने वापरकर्त्यांना सल्ला

सरकारने याबाबत वापरकर्त्यांना अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. संशयास्पद लिंक्सवर क्लिक करु नकात, ईमेल किंवा एसएमएसद्वारे बँकिंग किंवा वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नका आणि सर्व आर्थिक व्यवहारांची अधिकृत संकेतस्थळांवरून पडताळणी करण्याचा सल्ला दिला आहे.

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! स्वस्तात शेअर्स खरेदी करण्याची सुवर्णसंधी, सरकार Coal India मधील आपली हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत

Web Title: Rbi lottery or inheritance email is a scam warns pib see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • bank RBI
  • Business News
  • cyber scam
  • Digital news
  • Marathi News
  • RBI
  • RBI Action
  • RBI news

संबंधित बातम्या

RBI चा थेट निशाणा! ‘या’ 5 Financial Companies वर झाली मोठी कारवाई;  थेट 27 लाखांचा Penalty  भरण्याचे आदेश
1

RBI चा थेट निशाणा! ‘या’ 5 Financial Companies वर झाली मोठी कारवाई; थेट 27 लाखांचा Penalty भरण्याचे आदेश

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?
2

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
3

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
4

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.