RBI Assistant Prelim Result Out
मुंबई- १ फेब्रवारीला देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला गेला. यात नोकरदारांना दिलासा देणारी बाब म्हणजे वैयक्तिक वार्षिक उत्पन्नातील आयकर कर (TAX) जो आधी पाच लाखांपर्यंत होता, त्यात वाढ करुन आता सात लाखापर्यंत कोणताही कर लागणार नाही, असा दिलासा केंद्र सरकारने बेजटमधून दिला आहे. दरम्यान, आज आरबीआयचं (RBI) पतधोरण जाहीर होणार आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (shaktikant Das) पतधोरण जाहीर करणार आहेत.
व्याजदरात वाढ होणार?
दरम्यान, सध्या शेअर बाजारात कमालीची चढउतार आहे, तर दुसरीकडे गौतम अदानी यांच्या कंपनीचे गडाडले शेअर्श, तसेच जागतिक आर्थिक मंदी आदी प्रश्न सध्या देशात किंवा जागतिक अर्थव्यवस्थेत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दरात 2.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्या तुलनेत भारतात आरबीआयने व्याज दरात फारशी वाढ केली नाही. मात्र आता आरबीआय आणखी व्याज दरात वाढ करण्याची शक्यता आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यास गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. आधीच महागाई वाढली आहे त्यात अजून भर पडण्याची शक्यता आहे.
रेपो दर वाढल्यास…
रिझर्व्ह बँकेच्या (RBI meeting) बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेकडून आज नवीन पतधोरण जाहीर केले जाणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील नवीन निर्णयाची माहिती देतील. भारतीय रिझर्व्ह बँकेची द्विमासिक पतधोरण आज जाहीर केले जाणार आहे. आरबीआय आणखी व्याज दरात वाढ करणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यास गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. आधीच महागाई वाढली आहे त्यात अजून भर पडण्याची शक्यता आहे.