X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्ससाठी एलन मस्कने एक नवीन आणि अनोखं फीचर रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे. मस्कने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी अखेर X Chat रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. जे एक्सचे नवीन फुल-स्टॅक कम्युनिकेशन प्रोडक्ट आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मालक आणि चीफ टेक्निकल ऑफिसरने सांगितलं आहे की, X Chat बीटामध्ये इंटीग्रेट केले जात आहे आणि हे फीचर सध्या काही ठरावीक युजर्ससाठी उपलब्ध आहे.
हे फीचर डायरेक्ट मेसेजेस (DM) मध्ये विलीन होणार आहे आणि त्याची जागा घेणार आहे. DM दिर्घकाळापासून प्लॅटफॉर्मचे पीयर-टू-पीयर कम्युनिकेशन चॅनेल आहे. नवीन लाँच केल्या जाणाऱ्या अपडेटमध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत, जसे पूर्णपणे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, फाइल ट्रांसफर आणि वॅनिशिंग मेसेजे. (फोटो सौजन्य – Pinterest)
एलन मस्कने पोस्ट शेअर करत सांगितलं आहे की, X ने आता एक पूर्णपणे नवीन कम्युनिकेशन स्टॅक रोल आउट केले आहे, ज्यामध्ये एन्क्रिप्टेड मेसेजेस, ऑडिओ/व्हिडीओ कॉल्स आणि फाइल ट्रांसफर यांचा समावेश आहे. मस्कने गेल्या महिन्यात एक घोषणा केली होती की, X Chat एका स्टँडअलोन प्लॅटफॉर्मच्या रुपात सादर केले जाणार आहे. अद्याप X Chat एका स्टँडअलोन प्लॅटफॉर्मच्या रुपात सादर केले नसले तरी मस्कने केलेल्या या घोषणेनंतर आता अखेर एक्ससाठी X Chat रोल आउट करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता युजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये या नवीन फीचरचा वापर करू शकणार आहेत.
Chat चा सर्वात मोठा फोकस एन्क्रिप्शनवर आहे. सर्व DMs डिफॉल्ट रुपाने एन्क्रिप्टेड नाहीत. मात्र पेड सब्सक्राइबर्स एका वेगळ्या टॅबमध्ये एन्क्रिप्टेड चॅट करू शकणार आहेत. चॅट ही वेगळी प्रणाली काढून टाकते आणि सर्व संभाषणांसाठी एकच, पूर्णपणे एन्क्रिप्टेड लेयर प्रदान करते. पूर्वी एन्क्रिप्ट केलेले नसलेले संदेश देखील आता सुरक्षित असतील. मस्कने यापूर्वी त्याच्या एन्क्रिप्शन क्षमतांची तुलना सिग्नल आणि मेटा-मालकीच्या WhatsApp सोबत केली आहे.
ज्या युजर्सना हे नवीन अपग्रेड मिळणार आहे, त्यांना सर्वात आधी Chat साठी एक चार अंकी पिन सेट करण्यास सांगितलं जाणार आहे. पिन सेट केल्यानंतरच युजर्स त्यांचे मेसेज पाहू शकणार आहेत. प्रत्येक वेळी अपग्रेडचा इंटरफेस ओपन केल्यानंतर युजर्सना पिन एंटर करावा लागणार आहे. अनेक X वापरकर्त्यांनी दरवेळी या दुसऱ्या ऑथेंटिकेशनच्या लेयरबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
X डेवलपर प्लेटफॉर्मचे हेड, क्रिस्टोफर पार्क यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये सांगितलं आहे की, कंपनीने अलीकडेच अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. जसे Grokipedia, X Chat आणि X API beta. याशिवाय कंपनी लवकरच Grok Imagine चे मोठे अपग्रेड, X Money आणि फुली Grok-पावर्ड X feed देखील लाँच करणार आहे.
Ans: अधिकृत X अॅप किंवा वेबसाइट उघडून मोबाइल नंबर/ईमेल, नाव आणि पासवर्ड भरून अकाउंट तयार करता येते.
Ans: प्रिमियम सब्सक्रिप्शन (X Premium) घेऊन ब्लू टिक मिळू शकते. तसेच सरकारी/संस्था यांना ग्रे आणि गोल्ड टिक मिळते.
Ans: X Creator Program, Ads Revenue Share, Subscriptions यांद्वारे क्रिएटर्स पैसे कमवू शकतात.






